सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांची पाहणी*

संभाजीनगर वाळूज औद्योगिक वसाहतीमधील सागर ऑक्सिजन वायू निर्मिती प्रकल्प आणि झांबड ऑक्सिजन वायू निर्मिती

Sudarshan MH
  • Apr 24 2021 5:57PM

*_• कोविड रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता पडणार नाही._*

*_• सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण 10 मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती_*

संभाजीनगर वाळूज औद्योगिक वसाहतीमधील सागर ऑक्सिजन वायू निर्मिती प्रकल्प आणि झांबड ऑक्सिजन  वायू निर्मिती प्रकल्पासोबतच गेवराई, चितेगाव व शेंद्रा या ठिकाणी असलेल्या एकूण सहा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांस जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज भेटी दिल्या. औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व ऑक्सिजन प्रकल्पामधून एकूण 10 मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती होत आहे. यात वाढ करण्यासाठी प्रशासनाकडून या प्रकल्पांना मदत व सहकार्य करण्याची ग्वाही जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यावेळी दिली. 
जिल्ह्यातील गरजू कोविड रुग्णास ऑक्सिजन सिलिंडरची कमतरता पडू दिली जाणार नाही. यासाठी औद्योगिक क्षेत्रातील सर्व ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांचे संपूर्ण सहकार्य प्रशासनास आहे. आवश्यक असलेल्या व उपलब्ध ऑक्सिजन साठ्याची तपासणी आणि निर्मितीमध्ये वाढ करण्याच्या उद्देशाने आज जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सहा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पास भेटी दिल्या. यावेळी संबंधित यंत्रणेला ऑक्सिजनचा पुरवठा रुग्णास वेळेत आणि समन्वयाने करावा अशा सूचना यावेळी संबंधित अधिकारी व यंत्रणेला केल्या. यावेळी समवेत अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, ऑक्सिजन पुरवठ्याचे नोडल अधिकारी श्रीमंत हारकर, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या श्रीमती वर्षा रोडे, सागर गॅस प्रकल्पाचे गणेश शेलकर, आणि झाबंड गॅस प्रकल्पाचे प्रणित झाबंड हे उपस्थित होते.
रुख्मिनी मेटल्स ॲण्ड गॅसेस लिमिटेड गेवराई येथील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पास भेट दिली. यावेळी रुख्मिनी मेटल ॲण्ड गॅसेस प्रकल्पाचे शाखा व्यवस्थापक आर.के.चोप्रा यांनी या प्रकल्पातील उपलब्ध ऑक्सिजन साठा निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या साधन सामुग्रीची माहिती दिली. यानंतर चितेगाव येथील आर.एल.स्टील ॲण्ड एनर्जी यांच्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पास भेट देऊन जास्तीत जास्त ऑक्सिजन निर्मितीसाठी या प्रकल्पाचे सहकार्य असून जिल्ह्यातील गरजू रुग्णांस ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी चोवीस तास तत्पर राहण्याच्या सूचना  जिल्हाधिकारी यांनी या प्रकल्पाच्या संबंधित यंत्रणांना दिल्या. रुग्ण संख्या भविष्यात वाढली तर योग्य नियोजन करुन सर्व प्रकल्पाची क्षमता, निर्मिती आणि जिल्ह्यातील रुग्णालयांची मागणी यासाठी समन्वय योग्य राखावा अशा सूचना नोडल अधिकारी तसेच या प्रकल्पांना वेळोवळी अपडेट माहिती द्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी या प्रकल्पास भेटी दरम्यान दिल्या. 
त्यानंतर शेंद्रा एमआयडीसीतील सृशील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प व स्टरलाईट ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प यांना भेटी देऊन उपलब्ध ऑक्सिजन साठ्याची पाहणी केली. यावेळी सृशील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प अजित जैन, स्टरलाईटचे शिफ्ट इन्चार्ज अरित्र मंडल  उपस्थित होते. 
चितेगाव येथील आर.एल.स्टील कंपनीच्या कार्यालयाच्या बाजूला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आर.एल.स्टीलचे संचालक नितीन गुप्ता, सी.पी.पटेल हे उपस्थित होते. 
*****

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार