*उद्योजक* मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्कॉर्पियो जिलेटीन ठेवल्याप्रकरणी निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांची राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) च्या माध्यमातून चौकशी सुरू आहे. या चौकशी दरम्यान अनेक आश्चर्यचकित करणारे वळण महाराष्ट्राने अनुभवले आहे.
मनसुखी हिरेन हत्या, वाजे सोबत सहकारी किती ?, वाझेंचा गहाळ मोबाईल, जाळलेले शर्ट, कुठलीही कल्पना न देता घटनास्थळी वाजेची तपास यंत्रणेकडून अचानक भेट, स्कॉर्पिओ आणि इनोव्हा सारख्या लक्झरी गाड्या विकत घेतलेल्या कार सेल एजन्सीची चौकशी, आणि या प्रकरणातून महाराष्ट्रात एकामागून एक होत असलेल्या घटना, बदल्या, आरोपी, याचिका, राजीनाम्याची मागणी. वगैरे वगैरे...
राज्याच्या जनतेचे किंबहुना संपूर्ण देशाचे लक्ष राजकीय पक्षांच्या बैठकी आणि पत्रपरिषदेत आरोप-प्रत्यारोपाचा खेला होबे कडे लागले असताना आज NIA चा तपासात एक वेगळे टर्निंग पॉईंट वाझे प्रकरण आले आहे. एक पंचतारांकित हॉटेल TRIDENT चा रूम नंबर 1964 वर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. आणि त्यात जे बाहेर आले आहे. ते म्हणजे क्राइम पेट्रोल ची स्टोरी सुरू आहे.. का असं वाटायला लागला आहे.
या पंचतारांकित हॉटेलमध्ये एक रूम -रूम नंबर 1964 नकली ओळखपत्राचा नावाने एका सोनार व्यापाराने तब्बल 100 रात्रीं साठी बुक केली आहे. आणि सचिन वाझे या खोलीत सलग 15 दिवस राहिले होते. महत्त्वाचे म्हणजे 25 फेब्रुवारीला मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटिन च्या 20 कांड्यानी भरलेलली संदिग्ध गाडी पोलिसांना दिसली. त्या आधी सचिन वाझे चा पंचतारांकित हॉटेलचा आत 16 ते 20 फेब्रुवारी दरम्यान एका मास्क लावलेल्या महिलेसोबत सीसीटीव्ही फुटेज मध्ये पाच काळा रंगाच्या मोठ्या बॅग सोबत दिसतो आहे. या हॉटेलच्या 35 वेगवेगळ्या कॅमेरातून ही महिला नेमकी कोण ? याचा तपास सुरू आहे. कारण रूमच्या दारा जवळ या महिलेच्या हातात पैसे मोजण्याचे यंत्र सीसीटीव्ही दिसून आले आहे. आणि वाझेंच्या गाडीत बसलेली सुद्धा दिसून आली आहे. याचा अर्थ लावण्याचे सखोल प्रयत्न एन. आय. ए करीत आहे. हि महिला नेमके कोण ? हे तिने लावलेल्या मास्क मुळे ओळखणे कठीण झाले आहे. त्याकरिता एक्सपोर्ट ची मदत घेतली जाते आहे.
खरं तर वाझे एक मोठी केस हँडल करीत होते. त्यात अनेक महिला व मुलींची चौकशी सुरू होती. अंदाज आहे की ही त्यातील एक महिला असावी.
मात्र आता एन.आय.एला या महिलेचा शोध घेणे फारच महत्त्वाचे झाले आहे. कारण वाझेंचे गुपित या महिले जवळ गुप्त आहे.
पहिले कारण- वाझे जवळ असलेल्या त्या पाच काळा रंगाच्या बॅग मध्ये नेमकं होतं तरी काय...?
दुसरे कारण-- त्यात पैसे होते, की जिलेटिन च्या काड्या की आणखी काहीतरी... ?
तिसरे कारण- महिलेचा हातात पैसे मोजण्याचे मशीन कशाला व कुठून आले...?
चौथी कारण-- एंटीलिया केस बद्दल महिले जवळ काय माहिती असावी ..?
पाचवे कारण-- रूम नंबर 1964 या खोलीची मिस्ट्री काय ते या महिलेला माहिती असेलच...
सचिन वाझे ची अनेक पद्धतीने चौकशी आतापर्यंत करण्यात आली आहे. मात्र ते एन.आय.ए सोबत त्यांच्या अनुभवाच्या आधारे ते माईंड गेम करीत आहे. आणि त्यांनी तपासात अनेक गोष्टी लपवल्या आहे. त्यांनी या महिलेला ओळखत नसल्याचे ही सांगितले आहे.
आजचा हा ANI चा अचंबित करणारा खुलासा काय काय आणि किती वळण घेईल. पुढे कुठले सत्य बाहेर काढेल याकडे सामान्यांचेही लक्ष केंद्रित झाले आहे.