सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

ग्रामविकासासाठी निधी कमी पडू देणार नाही - आमदार सुनील शेळके

आमदार सुनील शेळके

Sudarshan MH
  • Mar 12 2021 9:19PM
प्रतिनिधि:- दिपक चव्हाण 
पुणे मावळ : पंचायत समिती सभागृहात आमदार सुनिल शेळके यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
पहिल्या दिवशी मावळ तालुक्यातील सोळा ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. विकासकामांची असणारी सद्यस्थिती तसेच अनेक प्रलंबित विकासकामात असणाऱ्या समस्या व गावात कोणती कामे पूर्ण झाली आहेत, कोणती सुरु आहेत.याचा गावनिहाय आढावा घेण्यात आला. 
'ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजे, ज्यामुळे पायाभूत सुविधा सक्षम होण्यास मदत होईल. घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता व आरोग्य यासंबंधित नाविन्यपूर्ण प्रकल्प लोकसहभागातून राबविले पाहिजेत. शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहचवुन पात्र लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. रस्ते, वीज, पाणीपुरवठा योजना, ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाड्या, शाळा या विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही, असे त्यांनी सांगितले.
   अनेक गावात असणारे गावतळी, तलाव यांच्या नोंदी संबंधित विभागाने करून घ्याव्यात. अशा सूचना अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या आहेत.
यावेळी गटविकास अधिकारी सुधीर भागवत, सहा. गटविकास अधिकारी लक्ष्मण वाजे, ग्रामीण ब्लॉक आध्यक्ष सुभाष जाधव, जिल्हा नियोजन समिती सदस्य विठ्ठलराव शिंदे, सभापती निकिता घोटकुले, पंचायत समिती सदस्य गुलाबकाका म्हाळसकर, शांताराम कदम तसेच सर्व विभागाचे अधिकारी, ग्रामसेवक उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार