ज्येष्ठ प्रचारक श्रीकृष्ण मोतलग यांचे निधन
बालूजींनी आपले सर्व जीवनच संघासाठी समर्पित केले होते. ते मुळचे बुलढाणा जिल्ह्यातील भुमराळा गावचे रहिवासी.
ऑगस्ट
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारकआणि तत्कालीन सह प्रचारक प्रमुख बालुजी ऊर्फ श्रीकृष्ण मोतलग यांचे रविवारी रात्री महाल येथील संघ कार्यालयात वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात पुतण्या माधव मोतलग, पुतणी डॉ. मृणाल हरदास, जावई डॉ. मिलिंद हरदास आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या गंगाबाई घाट येथे सकाळी 9.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील.
बालूजींनी आपले सर्व जीवनच संघासाठी समर्पित केले होते. ते मुळचे बुलढाणा जिल्ह्यातील भुमराळा गावचे रहिवासी. त्यांनी तत्कालिन विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी घेतली आणि त्यानंतर प्रचारक जीवनाला प्रारंभ केला. नागपूर, कामठी येथे प्रारंभिक काम केल्यानंतर ते बंगाल, आसाम येथे क्षेत्र प्रचारकही राहिले. त्यानंतर त्यांच्याकडे अ. भा. सह प्रचारक प्रमुख पदाची जबाबदारी आली. गेल्या काही वर्षांपासून ते नागपूर येथील संघ कार्यालयात मुक्कामी होते. अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी संघ शाखा आणि स्वयंसेवकांशी संपर्क कायम ठेवला.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प