सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा - जिल्हाधिकारी एम डी सिंह प्लॅस्टीक राष्ट्रध्वजाचा वापर न करण्याचे आवाहन

प्लॅस्टीक राष्ट्रध्वजाचा वापर न करण्याचे आवाहन*

Sudarshan MH
  • Jan 22 2021 6:23AM
राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा - जिल्हाधिकारी एम डी सिंह*
 
 *प्लॅस्टीक राष्ट्रध्वजाचा वापर न करण्याचे आवाहन*
      यवतमाळ दि.21 : *प्रतिनिधी किरण मुक्कावार 9767271001*
 स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन व महाराष्ट्र दिन हे राष्ट्रीय सण राज्यभर साजरे करण्यात येतात. यावेळी राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान व्हावा हे प्रत्येक सुजान नागरिकांचे कर्तव्य आहे. त्यामुळे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी प्लॅस्टीक ध्वजाचा वापर करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केले आहे.
 
            प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम झाल्यानंतर खराब झालेले, फाटलेले, रस्त्यांवर पडलेले, माती लागलेले राष्ट्रध्वज सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रमानंतर कार्यक्रम स्थळी इतरत्र पडलेले आढळतात. राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता होय. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होता कामा नये. राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक असल्याने स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी, सुजाण व जागरूक नागरीक, ग्रामपंचायत, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, तालुका माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, आरोग्य संस्था, सर्व खाजगी संस्था यांनी स्थानिक पोलीस यंत्रणेच्या मदतीने अशा प्रकारे प्लॉस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर होणार नाही, याबाबत काळजी घ्यावी.
 
तसेच विक्रेत्यांनी प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाची विक्री करू नये. प्लॅस्टीकचे ध्वज आढळून आल्यास संबंधीत तहसिलदार किंवा नगरपालिका कार्यालयात असे ध्वज जमा करावेत. तसेच 26 जानेवारी 2021 रोजीच्या कार्यक्रमाप्रसंगी जिल्ह्यातील नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी प्लॅस्टीक राष्ट्रध्वजाचा वापर करू नये, असेही आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार