सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नाशिक जिल्ह्यातील चार लाभार्थ्यांनी केला प्रातिनिधीक ई-गृहप्रवेश;विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना घरकुलाच्या चाव्या प्रदान

ई-गृहप्रवेश;विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना घरकुलाच्या चाव्या प्रदान

Sudarshan MH
  • Jun 17 2021 9:41AM
 
 
*नाशिक दि. 16 जून 2021 (विमाका वृत्तसेवा):*
 
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनांची अंमलबजावणी गतिमान करुन त्यामध्ये गुणवत्ता आणण्यासाठी 30 नोव्हेंबर 2020 ते 5 जून 2021 या कालावधीत विभागात महाआवास अभियान-ग्रामीण राबविण्यात आले. या योजनेंतर्गत असलेल्या लाभार्थ्यांना काल दुरदृष्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित ई-गृहप्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते जिल्ह्यातील चार घरकुल लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात चाव्या प्रदान करण्यात आल्या.
 
महाआवास अभियान-ग्रामीण अंतर्गत ई-गृहप्रवेश कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते काल मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे ग्रामविकास व महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार आदी मान्यवर उपस्थित होते. नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातून आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यासह उपायुक्त (विकास) अरविंद मोरे, सहआयुक्त प्रतिभा संगमनेरे आदी मान्यवर उपस्थित होते. 
 
या कार्यक्रमात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते नाशिक जिल्ह्यातील गौळाणे येथील मिराबाई शिवराम चुंबळे, निफाड तालुक्यातील कसबे सुकणे येथील पुंजाराम कारभारी चारोस्कर यांना प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण योजनेंतर्गत ई-गृहप्रवेश चावी प्रदान करण्यात आली, तर धोंडेगाव येथील भास्कर राजाराम पगारे यांना रमाई आवास योजनेंतर्गत तर सिन्नर तालुक्यातील वडजिरी येथील रामदास दत्तू आंबेकर यांना शबरी आवास योजनेंतर्गत अभियान कालावधीमध्ये पूर्ण झालेल्या या घरकुल लाभार्थ्यांचा ई-गृहप्रवेश करण्यात आला.
 
0000000000

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार