सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मराठवाडा वॉटर ग्रीड रद्द करण्याचं महाविकास सरकारकडून महापाप

प्रतिनिधी- मराठवाड्याचे भवितव्य बदलण्यासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असणारी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मी स्वतः

Sudarshan MH
  • Jun 18 2021 5:43PM


शेतकरी आणि मराठवाडा विरोधी सरकारला मराठवाड्यातील शेतकरी आणि सर्व सामान्य जनता यांचा तळतळाट नक्की लागणार

माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची घणाघाती टीका

प्रतिनिधी- 
मराठवाड्याचे भवितव्य बदलण्यासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असणारी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मी स्वतः पाणीपुरवठा मंत्री म्हणून बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून साकार होणारी मराठवाडा वॉटर ग्रीड साठी फडणवीस सरकारच्या काळात १० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती एकूण ४० हजार कोटी रुपये खर्च करून मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प उभारला जाणार होता परंतु दुर्दैवाने सरकार बदलले आणि विद्यमान महाविकास आघाडी सरकारने हे शेतकऱ्यांचे सरकार म्हणून सत्तेवर येत शेतकऱ्यांच्याच तोंडाला पाने पुसण्याचे काम केला आहे  परंतु दुर्दैवाने सरकार बदलले आणि विद्यमान महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचा सरकार म्हणून सत्तेवर येत शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केला आहे मागील वर्षी मराठवाडा वॉटर ग्रीड साठी २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती ही तरतूद अत्यंत कमी आहे असे मागील वर्षी देखील तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी पाणीपुरवठा मंत्री म्हणून मी अनेकदा स्पष्ट केलं आहे परंतु महाविकास आघाडी सरकारचा मराठवाड्याबाबत असणारा दृष्टीकोन हा सकारात्मक नसून मराठवाड्याचे भवितव्य बदलणारी मराठवाडा वॉटर ग्रीड सरकारने रद्द करण्याचे महापाप आपल्या पदरी पाडून घेतले आहे अशी घणाघाती टीका माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केली.


हे सरकार मराठवाड्याच्या मुळावर उठले आहे,
मराठवाडयात सर्व जिल्हे आणि तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या जिवणात पिण्याच्या पाण्याचे आठराविश्व दारिद्रय दुर व्हावे आणि सर्वांना मुबलक पाणी मिळावे, हे लक्षात घेवून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणविस, तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार  आणि  तत्कालीन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री असे आमच्या सर्वांच्या माध्यमातून तत्कालीन सरकारने मराठवाडा वॉटर ग्रिड योजणा मंजूर केली होती या योजनेमुळे मराठवाड्यातील उद्योगाला शेतीला आणि सर्वसामान्य जनतेला पिण्याच्या पाण्याची सोय केली जाणार होती परंतु आता ही योजना बंद केल्यामुळे मराठवाड्याचा दुष्काळ पूर्णपणे संपविण्याचे देवेंद्र फडणवीस सरकारचे स्वप्न महाविकास आघाडी सरकारच्या उदासीन आणि मराठवाडा विरोधी भूमिकेमुळे अपूर्ण राहणार असून विद्यमान महा विकास आघाडी सरकारने ही योजना बंद करून मराठवाड्याच्या जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत अशी घणाघाती टीका माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांनी केली.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून धरणे पाईपलाईनद्वारे ऐकमेकाला जोडून दरी डोंगर त्यात , वस्ती तांडयावर पाणी देणारी अभिनव योजणा ठाकरे सरकारने जुजबी कारण दाखवत गुंडाळली असून कामाच्या निविदा थंड बसत्यात गुंडाळून ठेवल्या आहेत. केवळ राजकिय द्वेषापोटी सरकारने जनतेच्या तोंडी आलेले पाणी थांबवण्याचे महापाप महा विकास आघाडी सरकारने केली असल्याची टीका देखील यावेळी लोणीकर यांनी केली

सरकार बदल्या नंतर केवळ राजकिय  द्वेषातून ही योजना ठाकरे सरकारने मागे टाकली . व्यवहार तपासण्याचा नावाखाली वर्ष लोटले तरी गुंडाळून ठेवलेल्या निवीदा धुळ खात पडु दिल्या. परिणामी सरकारने योजना गुंडाळून टाकली. देवेंद्र जी फडणविस मुख्यमंत्री असतांना आणि मी त्या खात्याचे मंत्री असताना मराठवाडा वॉटर ग्रीड अत्यंत महत्त्वाकांक्षी  योजना मंजूर केली होती या योजनेमुळे संपूर्ण मराठवाड्याचे भाग्य बदलेल अशी आशा अभ्यासकांना होती. परंतु दुर्दैवाने  महाविकास आघाडी सरकारने यात राजकारण करून केवळ फडणवीस सरकारच्या काळात मंजूर करण्यात आलेली योजना  राजकीय द्वेषापोटी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला  ही बाब मराठवाड्याच्या दृष्टीने अत्यंत दुर्भाग्यपूर्ण असून मराठवाड्यातील जनता महाविकास आघाडी सरकारमधील सर्वच पक्षाच्या नेतृत्वाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही  अशी घणाघाती टीका देखील यावेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केली 

इझ्रायल च्या मेकारेट कंपनीमार्फत अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून या योजनेचे जिल्हानिहाय टेंडर काढले होते. त्यामध्ये औरंगाबाद, जालना, बीड, लातूर आणि उस्मानाबाद या पाच जिल्ह्याचे टेंडर प्रसिद्ध झाले होते. तर परभणी, हिंगोली व नांदेड या तीन जिल्ह्याचे टेंडर पूर्णपणे तयार होते त्यासाठी लागणारा 20 हजार कोटीपेक्षा अधिक खर्च मंजूर झाला होता . मराठवाड्यात एकूण 11 मोठी धरणे  बंद जलवाहिनी द्वारे ऐकमेकांना जोडून दुष्काळी भागात पाणीपुरवठा होईल असा आराखडा तयार झाला होता. या योजणेत 1,330 लांब मुख्य जलवाहणी आहे .3,220 किमी जलवाहिनी प्रत्येक तालूक्यात पाणी देण्यासाठी होती . योजणेचा एकूण खर्चा पैकी 10,595 कोटीचा पहिला टप्पा आर्थीक तरतूद केलेली होती . तर 3,855 कोटी अशुध्द पाणी मुख्य जलवाहणी साठी होते . केवळ पिण्याचे पाणि नाही तर शेती आणि उदयोगाला लागणारे पाणी नियोजण यात होते . खर तर हि योजणा मराठवाडयातील सामान्य जनता शेतकरी यांच्यासाठी वरदान ठरणारी च होती . मात्र सरकार बहलताच महा विकास अघाडीच्या सरकारने जनतेच्या तोंडचे पाणी काढताना योजनाच गुंडाळली आहे . याची भिती होती म्हणुनच माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी पाणी प्रश्नावर संभाजीनगरला एक दिवशाचे उपोषण केले होते. ही योजना तांत्रिक दृष्ट्याा योग्य नाही अशा वल्गना विद्यमान सरकारमधील अनेक नेत्यांनी केल्या होत्या परंतु प्रत्यक्षात कोणतीही शहानिशा केली नाही केवळ राजकीय द्वेषापोटी ही योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांसह मराठवाड्यातील जनतेचा छळ सुरू केला आहे, या शेतकरीविरोधी आणि मराठवाडा विरोधी सरकारला मराठवाड्यातील शेतकरी आणि सर्व सामान्य जनता यांचा तळतळाट नक्की लागणार असेही माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यावेळी म्हणाले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार