सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*संघ मुख्यालय मोहिते वाड्याची पवित्र मातीचे अयोध्येला प्रस्थान.*

आंबोरा संगम येथील जल,वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथील माती, प्रभू श्रीरामचंद्रांच्या परम पवित्र पदस्पर्शाने पावन झालेली नगरी रामटेक येथील गड मंदिरातील माती. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना 1925 साली ज्या पुण्यस्थली मोहिते वाड्यात डॉ. हेडगेवार यांनी केली. तेथील माती अयोध्येला पाठविण्यात आली आहे.

Snehal Joshi
  • Jul 24 2020 11:10PM
महाराष्ट्राचे ऐतिहासिक शहर जे संघ गंगोत्री चा नावाने देखील प्रसिद्ध आहे. संघ गंगोत्री म्हणजे संघ विचारधारेचा उगम जिथे झाला ती महाल जुने शहर भागातील संघ मुख्यालयाची भूमी होय. अयोध्येत श्रीराम मंदिर निर्माणासाठी विदर्भातील तीर्थक्षेत्राची माती व जल हे अयोध्या ला जायला निघाली आहे. मंदिराचे 5ऑगस्टला भूमिपूजन होणार असून त्या अनुषंगाने श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्रे विश्वस्त मंडळाद्वारे भारतातील पवित्र नद्यांचे आणि तीर्थक्षेत्रांची माती मंदिराच्या पायाभरणीसाठी बोलावण्यात आली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर विदर्भातील आंबोरा संगम येथील जल,वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथील माती, प्रभू श्रीरामचंद्रांच्या परम पवित्र पदस्पर्शाने पावन झालेली नगरी रामटेक येथील माती. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना 1925 साली ज्या पुण्यस्थली मोहिते वाड्यात डॉ. हेडगेवार यांनी केली. तेथील माती अयोध्येला पाठविण्यात आली आहे. मोहिते वाड्याची माती प्रांत संघचालक राम हरकरे यांच्या हस्ते विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांना सुपूर्त करण्यात आली. याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे नागपूर महानगर अध्यक्ष सुदर्शन शेंडे,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर कार्यवाह अरविंद कुकडे. विश्‍व हिंदू परिषदेचे प्रांत सहकोषाध्यक्ष हरीश हरकरे, नागपूर महानगर मंत्री प्रशांत तितरे, बजरंग दल महानगर स्वयंसेवक विशाल पुंज व इतर मान्यवर या वेळी उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार