सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मिशन विश्वास- नागपूर महानगरपालिकेसोबत सेवारत आहेत रा.स्व.संघ, लोक कल्याण समितीचे कोरोना वारियर्स

रुग्णांची वाढती संख्या बघता कोरोनाबाधित व बाधितांच्या संपर्कात आलेल्यांना विलगित करणे यासाठी सरकारी यंत्रणा अपुरी पडत आहे.  हे लक्षात घेऊन महानगर पालिकेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, लोक समस्या संशोधन व लोक कल्याण समितीच्या सहकार्याने 'मिशन विश्वास' हे अभियान सुरु केले आहे.

Snehal Joshi .
  • Aug 29 2020 8:28PM
गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यावर उपाययोजना म्हणून महानगरपालिकेने देखील अधिकाधिक लोकांची चाचणी करण्याचे धोरण अवलंबिले आहे. यामुळे संशयित रुग्णांची वेळीच चाचणी होऊन रोगाच्या प्रसाराला व मृत्यमुखी पडणाऱ्यांच्या संख्येला आळा बसेल.  रुग्णांची वाढती संख्या बघता कोरोनाबाधित व बाधितांच्या संपर्कात आलेल्यांना विलगित करणे यासाठी सरकारी यंत्रणा अपुरी पडत आहे.  हे लक्षात घेऊन महानगर पालिकेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, लोक समस्या संशोधन व लोक कल्याण समितीच्या सहकार्याने 'मिशन विश्वास' हे अभियान सुरु केले आहे.   महापालिकेच्या प्रत्येक झोनच्या अधिकाऱ्यांसोबत समन्वय ठेवून, कोरोनाबाधितांच्या  संपर्कात आलेल्यांच्या याद्या बनवून त्यांना चाचणी करण्यासाठी प्रोत्साहित करणे, तसेच कोरोना बाधित कुटुंबाला आवश्यकता भासल्यास त्यांच्या  दैनंदिन गरजांची पूर्तता करणे असे हे कार्य आहे. महत्त्वाचे म्हणजे या गृहविलगित लोकांची मानसिकता ढासळू नये यासाठी त्यांचे समुपदेशन करणेही सुरू आहे. कोरोनाबाधित व्यक्ती दवाखान्यात भरती असतो व तिथे त्याची माहिती घ्यायला जाणे शक्य नसल्याने त्याच्या विलगित नातेवाईकांच्याद्वारेच बाधितांच्या संपर्किताची माहिती काढून त्यांची यादी बनवून ती महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिली जाते. आतापर्यंत ७,००० पेक्षा जास्त कोरोना बाधितांशी संपर्क करण्यात आलेला आहे.  विलगित लोकांना पहिलेच मानसिक धक्का बसलेला असतो. ते यात एकटे नाहीत, समाजही त्यांच्या सोबत आहे असा त्यांच्या मनात विश्वास निर्माण करत अत्यंत संयमाने हे  जिकरीचे काम सुरु आहे.त्यात कोरोनाबाधित जर घरचा कर्ता असेल व घरी निराधार वृद्ध असतील तर त्यांना शारीरिक व मानसिक आधार देणे, त्यांच्या औषधांची व्यवस्था करणे अशी अनेक कामे या सेवाकार्यात होत आहेत. कोरोना झाला की भौतिक दुरावा होतोच, पण हा सामाजिक दुरावा बनू नये, संपूर्ण समाज या आपत्तीतही एकजिनसी  राहावा यासाठी  हे कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव जागृत करणाऱ्या "सेवांकुर" या संस्थेचे कार्यकर्ते सुद्धा या कामात सहभागी आहेत.  महापालिकेच्या १० झोन मध्ये समितीचे प्रत्येकी २० कार्यकर्ते या अभियानात सहभागी आहेत. हे सेवाकार्य करतांना ते  मुखाच्छादन व भौतिक दूरतेची पुरेपुर काळजी घेतात. टाळेबंदीच्या काळात  संपूर्ण व्यापार व उद्योग जगत बंद असल्याने सामान्य जनांना आर्थिक फटका पडला.  त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, लोककल्याण समिती द्वारे वंचितांना दैनंदिन गरजांच्या वस्तूंच्या किटस् चे वाटप करण्यात आले होते. अशा ६०,००० किट्स तेव्हा वाटण्यात आल्या होत्या

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार