सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राष्ट्रवाद हा विचारांचा आत्मा,गडकरी गोवेकरांना म्हणाले

राष्ट्रवादाचा सुवर्णकाळ देशातील जनतेला भाजपाने दाखवला. राष्ट्रवाद हा आमच्या विचाराचा आत्मा आहे. राष्ट्र सर्वप्रथम, सर्वोपरी आहे.

Snehal Joshi
  • Jun 22 2020 8:49PM
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने सुरक्षेचा दृष्टीने अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेसाठी कठोर कारवाई करणारे धाडसी निर्णय घेतले. राष्ट्रवादाचा सुवर्णकाळ देशातील जनतेला दाखवला. राष्ट्रवाद हा आमच्या विचाराचा आत्मा आहे. राष्ट्र सर्वोपरी आहे. देश सुखी, समृद्ध आणि शक्तिशाली झाला तर सुपर इकॉनॉमिक पॉवर देशाला शक्य होईल. हे आमच्या चिंतनाचे विषय आहे. असे केेंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. गोवा येथील भाजपाच्या जनसंवाद रॅलीला ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित करीत होते. याप्रसंगी गोव्याची मुख्यमंत्री, अन्य मंत्री, आमदार, भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते . गेल्या पाच वर्षात जो विकास आणि लोकोपयोगी कामे भाजपा सरकारने केली, ती काँग्रेसच्या 55 वर्षाच्या सत्ताच्या काळातही झाली नव्हती . काँग्रेसच्या काळात साम्यवाद, समाजवाद आणि भांडवलशाही फोफावली होती. पण आता हे तीनही वाद संपुष्टात आले आहेत. पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या सामाजिक व आर्थिईक चिंतनावर आधारित अंत्योदयाचा विचार भाजपाने मांडला आहे. त्या विचारावर कार्य सुरू झाले. असे सांगताना ते म्हणाले,की दरिद्री नारायणाची सेवा या देशातील शेवटच्या माणसापर्यंतची विकासगंगा पोहोचवणे आहे. अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गोष्टी प्राप्त करून देणे . जोपर्यंत समाजातील शेवटच्या माणसाला अन्न, वस्त्र, निवारा मिळत नाही. तोपर्यंत ही सेवा पूर्ण होत नाही असे ते म्हणाले. गरीब माणसाला केेंद्रबिंदू मानून आम्ही काम करीत आहोत. देशातील जातीयता, सांप्रदायिकता समाप्त व्हावी.सामाजिक समरसता प्रस्थापित व्हावी , या विचाराने पार्टी काम करते . पण काँग्रेसने केवळ अल्पसंख्यकांची मते मिळावी म्हणून आमच्याबद्दल अपप्रचार पसरवला. केंद्र सरकारने जनधन योजना आणली. 35 कोटी लोकांनी खाते उघडले आणि त्यांच्या खात्यात सरळ रक्कम जमा झाली. त्यावेळी आम्ही जातीपाती पाहिल्या नाहीत. 9 कोटी महिलांना उज्ज्वला गॅस सिलेेंडर व शेगडी दिली. त्यावेळी कुणाला जात विचारली नाही. सामाजिक शोषणाविरुद्ध आणि अन्यायाविरुद्ध आम्ही काम केले व करू . पण मतांच्या राजकारणासाठी अल्पसंख्याकांच्या मनात भीती निर्माण करण्याचे काम काँग्रेसने केले असल्याचे गडकरी म्हणाले. जम्मू काश्मीरचे 370 कलम निष्प्रभ करण्याचा धाडसी निर्णय मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपा शासनाने घेतला, असे सांगून गडकरी म्हणाले, काँग्रेसने केवळ अल्पसंख्यकांच्या दबावात आणि मतांच्या राजकारणासाठी 370 कलम रद्द करण्याचा निर्णय कधीच घेऊ शकले नसते. अतिरेक्यांविरुद्ध कडक कारवाई करून काश्मीरमध्ये व देशाच्या अंतर्गत भागात शांतता प्रस्थपित करण्याचे काम भाजपा शासनाने केले आहे. जम्मू काश्मीरच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या देशात सुखी, समृद्ध शक्तिशाली, सुपर एकॉनॉमिक पॉवर बनवून देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी सुशासन आणि विकासाची काम सुरू झाली आहेत. असे गडकरी यांनी गोवेकर यांना सांगितले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार