सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

उच्चशिक्षित आई-वडील आणि दोन चिमुकल्यांची आत्महत्या-- देणे करांच्या नावांची नोंद.

खोलीत पोलीसांना एक मृत्यूपूर्वी लिहलेली चिठ्ठी प्राप्त झाली असून,त्यात कोणाकोणाला किती देणी बाकी आहे,या कर्जांचा लेखाजोखा असल्याचे

Snehal Joshi .
  • Aug 19 2020 12:17AM
उच्चशिक्षित दाम्पत्याने आपल्या दोन मुलांसह आत्महत्या केल्याची घटना अंगावर शहारा आणणारी आहे.ही घटना आज नागपूर शहराजवळच्या कोराडीतील संत जगनाडे सोसायटी,ओमनगर, कोराडी नाका येथे घडली.प्रा.धीरज राणे(४२)डॉ.सुषमा धीरज राणे(३८)ध्रुव(११)वन्या(५)अशी मृतांची नावे आहेत. धंतोली येथील अवंती रुग्णालयात कार्यरत असलेल्या डाॅ.सुषमा आणि रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे प्रोफेसर असलेले त्यांचे पती प्रो.धीरज राणे यांनी मुलगा ध्रुव तसेच मुलगी वन्यासह मृत्यूला कवटाळल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली .आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्यांच्या खोलीत पोलीसांना एक मृत्यूपूर्वी लिहलेली चिठ्ठी प्राप्त झाली असून,त्यात कोणाकोणाला किती देणी बाकी आहे,या कर्जांचा लेखाजोखा असल्याचे पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले. डॉक्टरांची ६५ वर्षीय वयोवृद्ध आई की आत्या सोबत राहत होती,असे सांगितले जात आहे. हे कुटुंब दररोज पहाटेच उठून जात होते मात्र मंगळवारी सकाळी ९ वाजूनही भाचा,सून,नातवंडे कोणीही अद्याप खोलीच्या बाहेर न पडल्याने आत्या प्रमिला यांनी आवाज दिला. यावेळी सुषमा यांनी अजून झोप झाली नसल्याचे सांगितले. दूपारी दीडच्या सुमारास आत्या प्रमिला यांना प्रो.धीरज यांच्या खोलीचे दार अर्धवट उघडे दिसल्याने प्रमिला या आत गेल्या.धीरज ,ध्रुव आणि वन्या पलंगावर निपचित पडून होते तर बाजूच्या खोली डॉ.सुषमा या गळफास घेऊन लटकलेल्या होत्या! प्रमिला यांनी आरडाओरड करीत बाजूच्या किराणा दूकानदाराला हाक मारली.नंतर स्वत:च्या मुलीला फोन केला तसेच डॉ.सुषमा यांच्या भावाला फोन करुन घटनेची माहिती दिली.नियंत्रण कक्ष्ातही फोन केला.नियंत्रण कक्ष्ाने कोराडी पोलीसांना कळवले. त्यानुसार ठाणेदार वजीर शेख हे घटनास्थळी आपल्या ताफ्यासह पोहोचले. एकाच कुटुंबातील चार मृतदेह हे संशयास्पद स्थितीत आढळल्यामुळे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ.शशिकांत महावरकर,पोलीस उपायुक्त नीलोत्पल,गुन्हे शाखेची पथके तसेच ठसे तज्ज्ञ आणि फॉरेनिस्क चमू ही देखील पोहोचली. प्रो.धीरज,ध्रुव व वन्याचे मृतदेह जेथे होते तिथे इंजेक्शनच्या दोन रिकाम्या सिरींज आढळल्या. पोलीसांनी त्या ताब्यात घेतल्या.एकूणच घटनाक्रमावरुन राणे दाम्पत्यापैकी एकाने दोन मुलांसह तिघांची हत्या करुन स्वत:आत्महत्या केली असावी,असा संशय व्यक्त केला जात आहे. मध्यरात्री १२ वा.च्या सुमारास दाम्पत्यांशी वयोवृद्ध आईचे बोलणे झाले होते,असे एका निकटवर्तीयांनी सांगितले.कोराडी पोलीसांनी घराचा ताबा घेतला असून,ठोस पुराव्यांशिवाय हत्या कि आत्महत्या? अश्‍या कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचता येत नसल्याचे पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांनी सांगितले. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार