सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आपली माती परकी माणसं!

मोठ्या शहरांत अस्थायी स्वरूपात राहणाºया या कष्टकºयांची द्विधा मन:स्थिती झाली. मुख्यमंत्री त्यांना सर्व सोयीसुविधा पुरविण्याचं आश्वासन देत होते; परंतु कष्टकरी मजूर कुठलीच गोष्ट ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. कष्टकरी मजुरांना आपल्या जन्मभूमीची ओढ लागली होती. जन्मभूमी गाठण्यासाठी वाटेल ते कष्ट उपसण्याची त्यांची प्रबळ मानसिकता झाली होती.

रमेश कुलकर्णी
  • Jun 20 2020 4:32PM
आपला गाव सगळ्यांनाच प्रिय असतो. आपली माणसं साºयांनाच हवीहवीशी वाटतात. गावाचा सुगंध, शाळा, पार, आकाश, नदी आणि पाणी.. सगळंच!! पण आता उजेडात येत असलेल्या संशयित माणुसकीच्या कहाण्या आगीतून फुफाट्यात पडल्याची मन:स्थिती कथन करणाºया आहेत. स्थलांतरित श्रमिकांची स्थिती अशी बिकट झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउनचे टप्पे वाढत होते. मोठ्या शहरांत अस्थायी स्वरूपात राहणाºया या कष्टकºयांची द्विधा मन:स्थिती झाली. मुख्यमंत्री त्यांना सर्व सोयीसुविधा पुरविण्याचं आश्वासन देत होते; परंतु कष्टकरी मजूर कुठलीच गोष्ट ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. कष्टकरी मजुरांना आपल्या जन्मभूमीची ओढ लागली होती. जन्मभूमी गाठण्यासाठी वाटेल ते कष्ट उपसण्याची त्यांची प्रबळ मानसिकता झाली होती. मिळेल तो मार्ग स्वीकारून त्यांनी घराचा रस्ता गाठला. त्यात दुर्दैवानं अनेकांचे बळी गेलेत; परंतु घराची ओढ मात्र तसूभरही कमी झाली नाही. मागील महिन्यात स्थलांतरित मजुरांच्या प्रवासाचे भयावह चित्र मनात घर करून गेले. त्यांच्या प्रवासाच्या करुण कथा प्रत्येक संवेदनशील मनाला व्यथित करून गेल्यात. मजल दरमजल करीत कष्टकºयांनी ज्यावेळेस आपली जन्मभूमी गाठली, तेव्हा त्यांच्या चेहºयावरील समाधान फार काळ टिकू शकलं नाही. महाराष्ट्रातील बहुतांश छोट्या गावांत मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद व नागपूर या मोठ्या शहरांतून कष्टकºयांनी स्थलांतर केलं. ज्या आनंदानं त्यांनी गाव गाठलं तो आनंद फार काळ टिकला नाही. गावात त्यांचं स्वागत उपहासानंच केलं गेलं. कोरोना प्रतिबंधासाठी काळजी घेणं आवश्यक आहेच. परंतू विनाकारण काळजीचा अतिरेक करण्यात आला. गावाबाहेरच त्यांना अडवून त्यांची आरोग्य तपासणी करावी, असा ग्रामस्थांचा आग्रह त्यांना स्वीकारावाच लागला. आरोग्य तपासणीनंतर चौदा दिवसांचा ‘वनवास’ नशिबी आला. सधन आणि निर्धन असा सरळ भेदाभेद येथेही जाणवला. एकाच कोरोनाग्रस्त मोठ्या शहरातून परतलेल्या सधन, धनदांडगे आणि निर्धन श्रमिकांसमवेत वागण्याची भिन्न तºहा संशय निर्माण करणारी होती. आपल्याच मातीतील, आपल्याच माणसांचा अविश्वास त्यांच्या जिव्हारी लागला. गावात विलगीकरणाचं वेगळं कक्ष असण्याची शक्यता दुरपास्त होती. शाळा, महाविद्यालयं यांचा आधार घेण्यात आला. तिथं स्थलांतरित कुटुंबांची सोय करण्यात आली. जेथे शाळा अस्तित्वात नव्हत्या तेथे रानमाळावर तंबू ठोकून या स्थलांतरित कुटुंबांना आधार देण्यात आला. आपल्या चिमुकल्या लेकरांसह या उघड्या जागेवर राहण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता. स्थलांतरित वृद्धांची कथा तर अतिशय जीवघेणी आहे. सर्वच प्रकारच्या गैरसोयींचा स्वानुभव विलगीकरणातील स्थलांतरित कष्टकºयांनी घेतला. ज्यांना आपलं समजत होतो तेच आता परके झाले होते़ ‘कोरोना इफेक्ट’... अजून काय? कष्टकºयांच्या आयुष्यातील हाल-अपेष्टा इथंच संपल्या नाहीत. उलट त्या मोठ्या प्रमाणात वाढत गेल्या. नियतीचा खेळ बघा कसा असतो. ज्या मानसिक आधारासाठी आपलं गाव गाठण्याची तयारी केली होती त्याच गावानं परकेपणाची व अविश्वासाची वागणूक दिली. आर्थिकदृष्ट्या खचलेल्या मनाला निराधार करून टाकलं. ज्या जन्मभूमीकडे परतण्याची आस होती त्या भूमीनंच त्यांना नाकारलं, याची खोल जखम मनाला झाली. कोरोना रोगाच्या वाहकाचा शिक्का त्यांच्या माथी मारला गेला. परत आलेल्या कष्टकºयांमुळेच गावात कोरोना आला, असा आरोप करण्यात आला. काही बाबतीत या आरोपात तथ्य असलं तरी सरसकटपणे सर्वांनाच आरोपीच्या पिंजºयात उभं करणं हे स्थलांतरित कष्टकºयांसाठी वेदनादायी होतं. कोरोना बाधित झालेल्या कुटुंबाची अवहेलना वा पीडा तर फारच हृदयदावक आहे. त्यांची होत असलेली वाताहत व उपेक्षा मोठी आहे. ज्यांना शेतात काम करणं शक्य होतं त्यांनी शेताचा रस्ता धरला; परंतु बहुतांश हातांना गावात अद्याप काम नाही. गावात का परत आलो? या पश्चात्तापी भूमिकेत श्रमिक शिरले आहेत. ‘इकडे आड तिकडे विहीर’ या विचित्र कैचीत हे श्रमिक सापडले आहेत. मोठ्या आशेनं गावी परतलेल्या या श्रमिकांना आपल्यात सामावून घेण्याची खरी गरज आहे. त्यांच्या मनात वाळीत टाकल्याची भावना रुजायला नको. त्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्याची आज गरज आहे. त्यांच्याबद्दल परकेपणाची भावना मनातून काढून टाकायला हवी. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नात्यांमध्ये अढी वा दुरी येणार नाही, याची विशेष काळजी घ्यायला हवी. दुजाभावाची वेदना दुरगामी जखम करणारी असते, याची पुरेपूर कल्पना असू द्यावी. मोठ्या शहराला श्रमिकांची किंमत आता कळायला लागली आहे. सर्वच प्रकारचे कारखाने व उद्योगधंदे सुरू करण्याचे प्रयत्न उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडून सुरू झाले आहेत. कुशल कामगारांची उणीव तेथे भासायला लागली आहे. घरी परत गेलेल्या श्रमिकांना परत कामावर बोलाविण्यासाठी मालकांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. स्पेशल ट्रेन सोडण्याची मालकांची मागणी आहे. मालकांनी या श्रमिकांना गावातून परत आणण्याची व्यवस्था व खर्च करण्याची तयारी दर्शविली आहे. श्रमिकांचं महत्त्व अधोरेखित करणाºया या सुखद घटना आहेत. देशाच्या अर्थचक्राला गती देणारे हात हे या श्रमयोगींचेच असतात हे सिद्ध करण्यासाठी एवढं पुरं आहे. श्रमेव जयते! 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार