सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

हिंदुस्थानात चायनीज फूड वर बंदी घाला. आठवले यांचे आव्हान*

चीन च्या हिंदुस्थानातील वस्तुंवर, चायनीज फूड हॉटेल आणि चायनीज फूड वर हिंदुस्तानात बंदी घालण्याचे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे

Snehal Joshi
  • Jun 17 2020 11:50PM
भगवान बुद्ध हे शांतीचा संदेश देणारे आहे. हिंदुस्थान आणि चीन हे दोन्ही देश भगवान बुद्धांना मानणारे देश आहे. शांतीच्या महामार्गावर चालून हिंदुस्थान ने चीन सोबत व्यवहार केला. पण चीनला जर युद्धाची खुमखुमी असेल तर चीन ला कायमचा धडा शिकवू इतकी ताकद भारतीय सैन्यात आहे. असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला. लद्दाख येथील गलवाण खोऱ्यात चीनच्या सैन्याशी झालेल्या चकमकीत आपले 20 जवान शहीद झाले. त्यांना आठवले यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून चीनला इशारा दिला आहे. चीन च्या हिंदुस्थानातील वस्तुंवर, चायनीज फूड हॉटेल आणि चायनीज फूड वर हिंदुस्तानात बंदी घालण्याचे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे. चीन हे धोकेबाज राष्ट्र आहे. आणि हे भविष्यातही अशी धोकेबाजी करू शकतात. यांची घुसखोरी थांबवायची असेल तर चीनी वस्तूंना तिलांजली दिली पाहिजे. असे आठवले म्हणाले. हिंदी चीनी भाई भाई असे नारे देऊन,, चीन ने 1962 मध्ये हिंदुस्थानाला धोका देऊन हल्ला केला होता. आता हिंदुस्थानाचे सैन्य अधिक मजबूत असून चीनला धडा शिकवण्याची ताकत हिंदुस्थानी सैन्यात आहे. आता हिंदुस्थानात आमचे कोरोना शी युद्धास युद्ध सुरू आहे. त्यामुळे युद्ध करण्याची आमची इच्छा नाही. हिंदुस्थान शांती आणि अहिंसेचा तत्त्वावर ठाम आहे. पण जर चीन युद्ध करू इच्छित असेल तर युद्ध सीमेवरील असेल वा कोरोनाशी युद्ध आम्हीच जिंकू असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला. तसेच हिंदुस्थानात चायनीज फूड हॉटेल, चायनीज खाद्यपदार्थांवर सर्वांनी स्वयंस्फूर्त बहिष्कार घालावा. चायनीज फूड हॉटेल वर बंदी घालावी. असे आवाहन रामदास आठवले यांनी आज केले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार