सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राम कदम यांनी संजय राऊत यांना जुन्या आठवणी जाग्या करून दिल्या

तत्कालिन सरकारनं आरोग्य सेवांवर काम केलं असतं तर जम्बो सुविधांचं प्रमाण कमी असतं, शिवसेनेनं केली होती टीका

Snehal Joshi .
  • Sep 5 2020 11:15PM
मागच्या पाच वर्षांत फडणवीस सरकारने आरोग्यविषयक काम केले असते तर आज ज्या तात्पुरत्या सुविधा ‘जम्बो’ म्हणून उभाराव्या लागल्या ते प्रमाण कमी झाले असते. विरोधी पक्षांच्या टीकेचा, आरोपांचा मुख्य भर हा जम्बो कोविड केंद्रांवरच आहे. ही केंद्रे धडपणे चालू द्यायची नाहीत, असे म्हणत शिवसेनेनं तत्कालिन फडणवीस सरकारवर टीका केली होती. शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून त्यांच्यावर टीका केली होती. परंतु भाजपा आमदार राम कदम यांनी त्यावर प्रतिक्रिया देत फडणवीस सरकारच्या काळात आरोग्यमंत्री हे शिवसेनेचेच असल्याचं म्हणत टोला लगावला आहे. आरोग्य सेवेचा बोजवारा उडल्याचं खापर आधीच्या सरकारवर फोडताना संजय राऊन हे विसरले की, तेव्हा आरोग्यमंत्री शिवसेनेचेच होते. यांना स्मृतिभ्रंश झालाय की जनतेचं लक्ष स्वतःचं अपयशापासून झाकण्यासाठी की सुशांत सिंह प्रकरणात मोठे नेते, ड्रग माफीयांना वाचवण्यासाठी लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी ही गोष्ट तयार केली आहे,” असं म्हणत राम कदम यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्यावर टीका केली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार