सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राजगुरुनगर - खेड तालुक्यातील कोये कुरकुंडी गावचे सुपुत्र शहीद जवान संभाजी ज्ञानेश्वर राळे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी त्यांचे सांत्वन केले.

खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी त्यांचे सांत्वन केले.

Sudarshan MH
  • Jan 11 2021 3:22PM

प्रतिनिधी: दिपक चव्हाण पुणे

अविवाहित असलेल्या कै. संभाजी यांचे यंदा लग्न होणार होते. मात्र तत्पूर्वीच देशासाठी कर्तव्य बजावत असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला ही बाब मनाला चटका लावणारी बाब असल्याचे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले. या घटनेमुळे राळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घरातला एकमेव कर्ता पुत्र देशसेवा करताना गमावला गेला आहे. त्यामुळे मी तसेच आमदार मोहिते पाटील आम्ही त्यांच्या दु:खात सहभागी असून राळे कुटुंबाला आमच्याकडून सर्व प्रकारची मदत करु असा शब्द डॉ. कोल्हे यांनी दिला. यावेळी कै. संभाजी यांच्या भगिनीने लष्करात भरती होऊन आपल्या बंधुप्रमाणे देशसेवा करण्याची इच्छा व्यक्त केली. खासदार डॉ. कोल्हे व आमदार मोहिते पाटील यांनी त्यासाठी शक्य ती सर्व मदत केली जाईल असे आश्वासित केले. 

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, बाजार समितीचे सभापती बाळशेठ ठाकूर, रमेशशेठ राळे, अरुण चांभारे, अॅड. मनीषा पवळे, माणिकशेठ कदम, युवराज पडवळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यार्थी तालुकाध्यक्ष निलेश काळे, सोशल मिडियाचे अध्यक्ष विलास मोहिते पाटील, पुणे जिल्हा उपाध्यक्ष मयूर वाडेकर, कांचनताई ढमाले आदी उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार