सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

विद्यार्थ्यांच्या समाधानाचे काय ? ते तर असमाधानी राहतील*-- राज्यपाल कोश्यारी

परीक्षा न देता विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर त्यांना स्वतःचे समाधान लाभणार नाही. त्यांच्या समाधानाचं काय ? आजच्या युगात तंत्रज्ञानाचा वापर करून परीक्षा घेणे व त्याकरिता ज्या विद्यार्थ्यांकडे संगणक नाही, त्यांना संगणक पुरवून परीक्षा घेणे शक्य आहे.

Snehal Joshi
  • Jun 29 2020 7:00PM
परीक्षा न देता विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर त्यांना स्वतःचे समाधान लाभणार नाही. त्यांच्या समाधानाचं काय ? आजच्या युगात तंत्रज्ञानाचा वापर करून परीक्षा घेणे व त्याकरिता ज्या विद्यार्थ्यांकडे संगणक नाही, त्यांना संगणक पुरवून परीक्षा घेणे शक्य आहे. असे मत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी रविवारी व्यक्त केले आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयीन तसेच उच्च शिक्षण संस्था अध्ययन व अध्यापन यासाठी आधुनिक डिजिटल आणि नवे माध्यमांचा स्वीकार करावा. आय आय टी सारख्या संस्थांनी देखील ऑनलाइन अध्यापनाचा पर्याय स्वीकारला आहे. मात्र नवे तंत्रज्ञान, सुसंवाद, प्रमाणित आणि व्यवहार आहे का, याचा देखील विचार करणे आवश्यक ते म्हणाले. अकादमीस्थान फाऊंडेशन या उच्चशिक्षण संस्थांमधील शिक्षकांसाठी ऑनलाईन व्यासपीठाचे कार्य करणाऱ्या संस्थेने आयोजित केलेल्या ऑनलाईन अध्यापना करिता नवयुगातील साधने व विषयांवरील चर्चासत्रांचे (बेबिनार) राजभवन येथून उद्घाटन प्रसंगी राज्यपाल बोलत होते. काळा अनुसार अनेक गोष्टी बदलत असतात. परंतु अध्यापनात काही गोष्टी शाश्वत असतात. नवतंत्रज्ञान स्वीकारताना शिक्षणातील शाश्वत मूल्ये जपली पाहिजेत. लहान मुलांच्या नेत्र आरोग्याचा विचार करून लहानग्यांच्या अध्ययनासाठी ऑनलाईन साधने खरोखरच उपयुक्त आहेत का... याचा विचार होणे गरजेचे आहे,असेही ते म्हणाले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार