सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात पुन्हा एक संघर्ष*

राज्यपाल नियुक्ती विधान परिषद सदस्यांच्या मुद्द्यावरून राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात पुन्हा एक संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. हे नियुक्ती पुढचे दोन महिने तरी रखडणार

Snehal Joshi
  • Jun 27 2020 11:49PM
राज्यपाल नियुक्ती विधान परिषद सदस्यांच्या मुद्द्यावरून राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात पुन्हा एक संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. हे नियुक्ती पुढचे दोन महिने तरी रखडणार असल्याचे हळू आवाजात बोलले जात आहे. राज्यपाल नियुक्ती विधान परिषदेत 12 जागांसाठी असलेल्या कालावधी जूनच्या पहिल्या आठवड्यात संपला. या काळात 12 नव्या नावांची यादी सरकारकडून राज्यपालांकडे जाणे अपेक्षित होते. मात्र अद्याप यादी राज्यपालांकडे गेली नाही. या जागांसाठी असलेले निकषा वर राज्यपाल आग्रही असल्याने, या 12 जागांची नियुक्ती करणार रखडणारअसल्याचे बोलले जात आहे. यापूर्वीही राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात अनेक मुद्यावरून संघर्ष पाहायला मिळाला. कोरोना संकटात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून पाठवावे. असा प्रस्ताव महाविकासआघाडी ने दिला होता. राज्यपालांनी तो स्वीकारला नव्हता. अखेर विधान परिषदेची निवडणूक घेऊन मुख्यमंत्र्यांना या सभागृहावर पाठविण्यात आले. विद्यापीठ परीक्षेच्या मुद्द्यावरही राज्यपाल आणि सरकार यांच्यात वाद पाहायला मिळाला.कोरोना काळात अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यात यावा याबाबत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीला पत्र लिहिले. त्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी चांगलेच नाराज झाले. मंत्र्यांनी राज्यपालांच्या अखत्यारीत असलेल्या विषयांमध्ये ढवळाढवळ करू नये. याबाबत मंत्रांना समज द्या. असे पत्र राज्यपालांनी यापूर्वी मुख्यमंत्र्यांना पाठवले होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार