सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*राज्यपालांची डॉ. हेडगेवार स्मारक समितीला सदिच्छा भेट.*

75 वर्षीय राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याबद्दल एकच गोष्ट आपल्याला आता प्रकर्षाने जाणवते. ती म्हणजे त्यांची कार्य प्रबलता, उत्सुकता आणि त्यांची हाडाच्या कार्यकर्त्यांची स्फूर्ती...

Snehal Joshi .
  • Jul 28 2020 12:30AM
महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर शहराला असे भाग्य फार कमी प्राप्त होतं. की महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल यांचे सहज वास्तव्य नागपूर शहरात आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे गेले 4 दिवस नागपूरच्या राजभवनात वास्तव्यास आहे. मुंबईत दमट व कोरोना दूषित वातावरण तयार झाल्याने. त्यांना सुखरूप अशाच दुसर्‍या शहरात वास्तव्यास ठेवून. त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणे हे शासनाचे आद्य कर्तव्य आहे. म्हणून की काय राज्यपाल हे नागपूरच्या राजभवनात आराम आणि वास्तव्यास आहे. 75 वर्षीय राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याबद्दल एकच गोष्ट आपल्याला आता प्रकर्षाने जाणवते. ती म्हणजे त्यांची कार्य प्रबलता, उत्सुकता आणि त्यांची हाडाच्या कार्यकर्त्यांची स्फूर्ती... कारण ते नागपूर शहरात आल्या नंतर विदर्भाच्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणी सदिच्छा भेट देण्याचा त्यांनी सपाटा लावला. त्यात पहिल्या दिवशी गोरेवाडा प्राणी संग्रहालय, गांधीजींचे सेवाग्राम, आचार्य विनोबा भावे यांचे पवनार आश्रम, नागपूर शहराचे श्रद्धास्थान दीक्षाभूमी, आणि रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मारक समिती परिसरास भेट देऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व प्रथम सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार व द्वितीय द्वितीय सरसंघचालक परमपूज्य गोवळकर गुरुजींच्या स्मृतिचिन्हस श्रद्धासुमने अर्पण केली. यावेळी विदर्भ प्रांत संघचालक रामजी हरकरे, महानगराचे सरसंघचालक राजेशची लोया, सह संघ चालक श्रीधरजी गाडगे व डॉ. हेडगेवार स्मारक समितीचे सचिव अभयजी अग्निहोत्री उपस्थित होते. राज्यपालांचे वास्तव्य किती दिवस नागपूर शहराला लाभणार आहे. ही माहिती गुप्त ठेवण्यात आली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार