सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राज्यभर ओबीसी महासंघाचे थाळी वाजवा आंदोलन यशस्वी.

राज्याच्या विविध जिल्ह्यात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या आवाहनाला प्रतिसाद देत विविध ओबीसीच्या संघटना, ओबीसी मधील जाती संघटना ,यांनी लोकप्रतिनिधी यांचे घरासमोर टाळी वाजवा ,घंटा वाजवा आंदोलन केले.

Snehal Joshi .
  • Oct 8 2020 11:31PM
राष्ट्रीय ओबीसी महासंघाने राज्यभर आमदार खासदार यांच्या घरासमोर आपल्या संविधानिक मागण्यासाठी टाळी वाजवा आंदोलन केले राज्याच्या विविध जिल्ह्यात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या आवाहनाला प्रतिसाद देत विविध ओबीसीच्या संघटना, ओबीसी मधील जाती संघटना ,यांनी लोकप्रतिनिधी यांचे घरासमोर टाळी वाजवा ,घंटा वाजवा आंदोलन केले. या आंदोलनाची सुरुवात नागपूर मध्ये नागपूरचे खासदार तथा केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांचे घरासमोर करण्यात आले या आंदोलनात जवळपास दोनशे ते तीनशे कार्यकर्ते होते त्याप्रमाणे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते, यानंतर माननीय गडकरी साहेबांना त्यांच्या सचिवांमार्फत ओबीसीच्या मागण्याचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी प्रामुख्याने केंद्राने ओबीसीची 2021 मध्ये जनगणना करावी आणि केंद्र सरकार ओबीसी ची जनगणना करीत नसेल तर राज्याने आपली स्वतंत्र जनगणना करावी .तसेच राज्यातील ओबीसी प्रवर्गामध्ये मराठ्यांचा समावेश करण्यात येऊ नये आणि मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यास ओबीसी समाजाचा कोणताही विरोध नाही. तसेच ओबीसीचे असंविधानिक नॉन क्रिमीलेअर रद्द करून ओबीसींना न्याय द्यावा याशिवाय इतर मागण्या वर सुद्धा आंदोलन करण्यात आले . या निवेदनानंतर नागपूर शहरातील माननीय नामदार सुनील केदार, माननीय नामदार विजय वडेट्टीवार ,माननीय नामदार नितीन राऊत ,माननीय नामदार अनिल देशमुख ,माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माननीय खासदार कृपाल तुमाने, माननीय आमदार विकास ठाकरे, माननीय आमदार कृष्णा खोपडे, माननीय आमदार प्रवीण दटके, माननीय आमदार गिरीश व्यास, माननीय आमदार समीर मेघे, माननीय आमदार प्रवीण फुके, माननीय आमदार टेकचंद सावरकर ,माननीय आमदार विकास कुंभारे .याशिवाय राज्यातील विविध आमदार-खासदारांना ओबीसीच्या कार्यकर्त्यांनी, संघटनांनी निवेदन दिले काही कार्यकर्त्यांनी लोकप्रतिनिधींना जागे करण्यासाठी डफली ताट चमचे अशा साधनाचा वापर करून लोकप्रतिनिधींना ओबीसीसाठी जागे केले याप्रसंगी ओबीसी समाज जागा हो या देशाचा राजा हो .ओबीसी समाजाची जनगणना झालीच पाहिजे. याशिवाय अनेक नारे देण्यात आले. नागपूर शहरात आज दिवसभर ओबीसी महासंघाची वर्दळ सुरू होती अनेक गाड्या मोटरसायकल घेऊन समाज बांधव सहभागी झाले होते .यामध्ये केंद्रीय सचिव शरद वानखेडे ,महिला अध्यक्ष सुषमाताई भड, केंद्रीय सदस्या एडवोकेट रेखाताई बारहाते, कोषाध्यक्ष गुणेश्वर आरीकर ,शकील पटेल, श्री. त्रिशरण सहारे , शहराध्यक्ष संजय पन्नासे, , महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा कल्पना मानकर, लक्ष्मी सावरकर ,महिला शहर कार्याध्यक्ष नंदा देशमुख, माजी नगरसेविका नयना झाडे ,पूर्व नागपूर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक नाना झोडे, दक्षिण नागपूरचे कार्याध्यक्ष दिलीप गोमासे ,विदर्भाचे कार्याध्यक्ष माननीय शकील पटेल, शहराचे सहसचिव नामदेव भुयारकर , दक्षिण-पश्चिम चे अध्यक्ष उदय देशमुख, जिल्हा परिषद सदस्य अवंतिका लेकुरवाळे , मा रमेश लेकुरवाळे,विद्यार्थी संघाचे महासचिव रोशन कुंभलकर, विद्यार्थी संघाचे शुभम वाघमारे, मयुर वाघ, सोनिया वैद्य,अरुण वराडे, अशोक काकडे, राजेश राहटे, काँग्रेस चेशहर महासचिव परमेश्‍वर राऊत, ओबीसी सेलचे चंद्रकांत हिंगे, ओबीसी कर्मचारी संघाचे श्री भांगे, महिला महासचिव सुनिता येरणे ,ओबीसी ज्येष्ठ नागरिक संघाचे माननीय ठाकरे ,खैरे कुणीबी संघाचे पदाधिकारी ,पिछडा महासंघाचे प्राध्यापक रमेश पिसे, पिछडामहासंघाच्या, शहराध्यक्क्षा वंदना वनकर, शुभांगी घाटोळे, या सर्वासह शेवटी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी व देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी यांना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन पाठवावे असे शिष्टमंडळाने सुचविले. याच दरम्यान उद्या दिनांक ९-१०-२० ला दुपारी तीन वाजता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्या सोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाची तातडीने बैठक बोलवण्यात आली यासाठी तातडीने राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांच्यासोबत मुंबईला शिष्टमंडळ रवाना होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात या सर्व आंदोलनाची समाप्ती सर्वांचे आभार व्यक्त करून करण्यात आली. या संपूर्ण आंदोलनाची दाखल घेऊन मा. मुख्यमंत्री यांनी उद्या दिनांक 9.10.2020 रोजी ओबीसी नेत्यांची बैठक सैयान्द्री गेस्ट हाउस मुंबई येथे घेण्यात येत आहे या बैठकेला डॉ. बबनराव तायवाडे, सचिन राजूरकर, डॉ. अशोक जीवतोडे बैठकेला जात आहे. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार