राजर्षी शाहू सार्वजनिक वाचनालयात स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी साजरी
सिनगाव जहॉगीर:
तालुक्यातील सिनगाव जहॉगीर येथील राजर्षी शाहू सार्वजनिक वाचनालयात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर पुण्यतिथी साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष मनमोहन बंगाळे यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तर उपस्थितांनी आदरांजली वाहिली.
यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष भगवान मुंढे यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी मनमोहन बंगाळे,संजय डोईफोडे, गणेश डोईफोडे,तातेबा मुंढे, रावसाहेब डोईफोडे,विनोद बंगाळे,धर्माजी भालेराव,साहेबराव पठाडे, आदित्य शेळके, प्रेमकुमार बंगाळे आदिंची उपस्थिती होती.