महाड: महाड तालुक्यातील इसाने कांबळे गावात गोवंश हत्या झाली होती, त्याठिकाणी गोवंश हत्या रोखण्यासाठी गेलेल्या गोरक्षकांवर मुस्लिम जमावाने हल्ला केला होता. त्यामध्ये दिनेश दरेकर हा गोरक्षक गंभीर जखमी झाला आहे, त्यामुळे समस्त हिंदू समाज या घटनेमुळे आक्रमक झाला आहे. या घटनेचा विरोध म्हणून आज दिनांक २२ रोजी सकल हिंदू समाजाने याचा जाहीर निषेध म्हणून मोर्चा काढला. या मोर्च्यामध्ये गोहत्या बंदी ही झालीच पाहिजे, गोहत्या करणाऱ्यांवर अतिशय कडक कारवाई करावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
चवदार तळे ते प्रांत ऑफिस असा हा महामोरचा काढण्यात आला. ही गोवंश हत्या शेवटची हत्या असेल. या पुढे असे घडले तर हिंदू समाज सहन करणार नाही, असे निवेदनात सांगितले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात गोहत्या किंवा गोवंश हत्या झाली तर रायगड जिल्ह्यात हिंदू - मुस्लिम वाद चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.