सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नववर्ष साजरे करणाऱ्या नागपुरातील नामांकित हॉटेलवर पोलिसांची कारवाई

काल रात्री उशिरा अशी पार्टी सुरु असल्याचे  कळल्यावरून मध्यरात्री  विशेष शाखेचे पोलीस उपयुक्त गजानन राजमाने ययांच्या नेतृत्वात ही धाड  टाकण्यात आली. त्यावेळी रूफ टॉप वर जोरदार पार्टी सुरु असल्याचे दिसून आले.

Snehal Joshi .
  • Jan 1 2021 11:05PM
राज्य शासनाने ३१ डिसेंबरच्या निमित्ताने रात्री ११ नंतर कार्यक्रम साजरे करण्यास मनाई केली असतानाही रामदासपेठेतील एका प्रतिष्ठित हॉटेल मध्ये रात्री उशिरापर्यंत नववर्षाची रूफ टॉप पार्टी चालू असल्याची माहिती मिळाल्यामुळे गुन्हे अन्वेषण शाखेने हॉटेल तुला इंपिरियल वर धाड टाकली. यावेळी शासकीय आदेश धाब्यावर बसवून नववर्ष एन्जॉय करणाऱ्या ६२ व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले.  काल रात्री उशिरा अशी पार्टी सुरु असल्याचे  कळल्यावरून मध्यरात्री  विशेष शाखेचे पोलीस उपयुक्त गजानन राजमाने ययांच्या नेतृत्वात ही धाड  टाकण्यात आली. त्यावेळी रूफ टॉप वर जोरदार पार्टी सुरु असल्याचे दिसून आले. हॉटेल व्यवस्थापनातर्फे  या सर्व उपस्थितांना दारू, हुक्का अशा सर्व सोयी पुरवल्या जात असल्याचेही लक्षात आले. यावेळी कोविड  चे कोणतेही नियम पळाले जात नसल्याचेही निदर्शनास आल्यामुळे पोलिसांनी कठोर पाऊले उचलली.  काल रात्री ताब्यात घेतलेल्या ६२ व्यक्तींची पहाटेपर्यंत चौकशी सुरु असल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी हॉटेल व्यवस्थापन आणि  सेवा पुरवणारे कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील असे सांगण्यात आले. हे वृत्त लिहिलेपर्यंत सविस्तर माहिती मिळाली नव्हती. या कारवाईने शहरात प्रचंड खळबळ उडालेली आहे.     

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार