सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

RSS ची पूरग्रस्तांना मदतीचा हात...

अशा वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते स्वस्थ कसे बरे बसणार?. प्रशासनाला| होय, प्रशासनालाच|, फोन करून मदतीचा हात पुढे केला गेला. तहसील कार्यालयातून भोजन व्यवस्थे संबंधी सांगण्यात आले. संघाची यंत्रणा कामाला लागली.

Snehal Joshi . सौजन्य- श्रीकांत तिजारे, संजय रामगिरीवार
  • Sep 12 2020 7:53PM
“दुष्काळात तेरावा महिना..” या म्हणीचा अर्थ, आज तंतोतंत अनुभवास मिळतो आहे. होय| यावर्षी खरंच तेरावा महिना आहे. दिनांक २९ आणि ३० ऑगस्ट दरम्यान विदर्भातील पूर्वोत्तर भागात पुराने थैमान घातले. २७- २८, ऑगस्टला असलेली पावसाची संततधार, एवढे रौद्र रूप धारण करील, याची पुसटशीही कल्पना सामान्य जनांस नव्हती. दिनांक २९ ला हळूहळू नदीच्या पुराचे पाणी वाढू लागलं आणि नदीकाठी असलेल्या वस्त्या पुराच्या पाण्याने वेढल्या गेल्यात. सखल भागात पाणी भरलं. कुटुंब, सामानाची आवराआवर करू लागले. पण कसंचं काय? दिनांक ३० ला सकाळपासून पाण्याची पातळी झपाट्याने वाढू लागली. भंडारा शहराच्या तीनही बाजूला पुराच्या पाण्याने वेढा घातला. राष्ट्रीय महामार्ग ६ वर सकाळी नऊ वाजता एक फूट पाणी, तर सायंकाळी सहा वाजता पाच फूटाचे वर. अशा वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते स्वस्थ कसे बरे बसणार?. प्रशासनाला| होय, प्रशासनालाच|, फोन करून मदतीचा हात पुढे केला गेला. तहसील कार्यालयातून भोजन व्यवस्थे संबंधी सांगण्यात आले. संघाची यंत्रणा कामाला लागली. धान्य गोळा झालं. दुपारी तीन वाजता स्वयंपाकाला सुरुवात झाली. सायंकाळी सहा वाजता पर्यंत भोजन तयार होऊन, त्याची सहाशे पाकिटे तयार झालेत. पाकिटे, पिण्याचे पाणी (बॉटल्स) घेऊन स्वयंसेवक बंधू तहसील कार्यालयात गेले, तर तिथे कोणीही नाही. चौकशीअंती कळले, शहरातील वेगवेगळ्या चार भागात पूरग्रस्तांना तात्पुरता निवारा दिला आहे. कार्यकर्ते मंडळी लगेच सारे साहित्य घेऊन भगतसिंग शाळा टाकळी, आठवले महाविद्यालय, गांधी विद्यालय, नगरपरिषद, भंडारा येथे गेलेत. अन्नाची पाकिटे वितरित केली. पूरग्रस्तांच्या चेहऱ्यावरील भाव खूप काही सांगून जात होते. या कार्यात २५ स्वयंसेवक बंधू सहभागी होते. याच दिवशी महाविद्यालय स्वयंसेवकांनी पाण्यात अडकलेल्या व्यक्तींपर्यंत काही ठिकाणी NDRF च्या जवानांसोबत बोटीतून तर काही ठिकाणी स्वत: पोहत जावून खाद्यपदार्थ आणि पाण्याची गरज भागविली. २०० पाण्याच्या बॉटल्स यावेळी वितरीत करण्यात आल्या. आधीच कोरोनाचा प्रताप, आणि त्यात हे अस्मानी संकट. निसर्गाने परीक्षा बघायची तरी किती? पण अशा वेळी, मदतीचा हात स्वयंस्फूर्तीने पुढे येतो आणि, परिस्थिती रुपी जखमेवर फुंकर घालतो. आम्ही एकटे नाही. आमच्या सोबत कुणीतरी आहे हा भाव आपसूकच मनात जागृत होतो. कुठेही गाजावाजा न करता, अडलेल्या अनेकांना मदत करणारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मंडळी देवदूता सारखे धावून येतात हे अनेकांनी प्रत्यक्ष अनुभवलं आहे. पूर ओसरल्यानंतर शासन, लोकप्रतिनिधी, यांचा जमावडा, आश्वासन, तक्रारी, कुरघोडी खूप असतात. त्यांचे कवीत्व सुरूच असते. परंतु गरजेच्या वेळी प्रत्यक्ष धावून जाणं हेच दैवी कार्य. रा. स्व. संघाचे स्वयंसेवक अशा वेळी स्वयंस्फुर्तीने समोर येवून सेवा कार्यात सहभागी होतात. नदीकाठी असलेल्या आमच्या भटके समाज बांधवांची अक्षरशः दैना झाली, हो| आधी तुटक्या-फुटक्या झोपड्यात राहणारी, गेली पाच महिने घरीच अडकून पडलेली ही कुटुंबे, अक्षरशः रस्त्यावर आले| एका शाळेत त्यांना तात्पुरता आश्रय दिला गेला. दिनांक ३१ ला हळूंहळू पूराचे पाणी ओसरू लागले. १ सप्टेंबरला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते येथे पोहोचले. दुपारच्या जेवणाची सोय करून दिली. आकस्मिक प्रसंग निर्माण झाल्यास, शिधा व्यवस्था वस्तीवर पोहचविली गेली. पूर ओसरला. घरात घुसलेले पाणी ओसरले. पण, घरातील सामानाची, धान्याची झालेली नासाडी बघून, कर्त्या पुरुषाचे अश्रू थांबेनात. “पुनश्च हरिओम”, प्रमाणे, घराची स्वच्छता आलीच. सामानाची जमवाजमव आलीच. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाविद्यालय बंधूंनी, दिनांक ३ सप्टेंबरला, परिसरातील मंदिर, समाज भवन यांची स्वच्छता करण्याचा संकल्प केला. भंडारा शहरातील गणेशपुर, पिंडकेपार, महात्मा फुले कॉलनी, येथे जाऊन स्वच्छता अभियान राबविले. ब्लिचिंग पावडरचा छीडकाव/फवारा करून परिसर निर्जंतुक करण्यात आला. झाडझुड करून परिसर स्वच्छ केला. या सेवा कार्यात २३ स्वयंसेवक बंधू सहभागी झाले होते. स्वयंस्फूर्तीने केलेले हे कार्य| मनाला एक वेगळ समाधान देऊन जातं| भंडारा जिल्ह्यातील पवनी शहरातसुद्धा पुग्रस्ताना मदत करण्यात आली. रा. स्व. संघाच्या स्वयंसेवक बंधूनी, शहरातील व्यापारी वर्गाकडून कडून चिवड्याचे साहित्य गोळा केले. त्याचा चिवडा तयार करून तो सत्तर कुटुंबियांना वाटप करण्यात आला. आतापर्यंत आपण भंडारा शहरातील वैनगंगेला आलेल्या पूरपरिस्थितीवर सेवाकार्य बघितल. भंडारा शहरापासून पंचेवीस ते तीस की.मी. अंतरावर याच वैनगंगा नदीवर “गोसे” या गावी धरण बांधलेले आहे. त्याला “इंदिरा सागर” असं नाव आहे. भंडारा शहरात पुराचे पाणी घुसू लागले आणि याच गोसे धरणाचे सर्वच्या सर्व दरवाजे उघडल्या गेलेत. आणि काय?... ब्रह्मपुरी, चंद्रपूर या शहरांना पुराच्या पाण्याने विळखा घातला. इथेही धवून आली ती संघ मंडळीच. गोसेखुर्द्चे पाणी मोठ्या प्रमाणत वैनगंगा नदीत सोडल्याने आलेले संकट ओळखून अगदी सुरवातीपासूनच चंद्रपूर येथील स्थानिक स्वयंसेवकांनी पूरग्रस्तांच्या मदत कार्यात स्वत:ला झोकून दिले. गावागावात अडकलेल्या पूरग्रस्तांपर्यंत प्रशासनाकडून आलेले पिण्याचे पाणी पुरविणे, शिजविलेले अन्न, आपत्ती व्यवस्थापन दलासोबत बोटीवर चढवणे, बोट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे, साहित्य बोटीतून उतरवून ट्रक्टर मध्ये चढवणे, महिला रुग्णांना प्राधान्याने सुरक्षित स्थळी हलवायचे, या सारख्या मदत कार्यात स्वयंसेवक, प्रशासनासोबत कार्यरत होते. प्रशासनाकडून पूरग्रस्तांसाठी शिजविलेल्या अन्नाची पाकिटे तयार करण्यासाठी संघ परिवारातील विविध संघटना, (महिला, विद्यार्थी स्वयंसेवक, राष्ट्र सेविका समिती, विद्यार्थी परिषद कार्यकर्ते), सहभागी झाल्या होत्या. पूर ओसरल्या नंतरही, गावागावात पडलेल्या घरांचा मलबा, साचलेला गाळ, यामुळे गावाची स्थिती भयावह झाली होती. अशा परिस्थितीत रोगाची साथ निर्माण होवू नये, म्हणून रा. स्व. संघाचे डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी समितीच्या माध्यमातून स्वच्छता मोहिमेच्या कामी लागले. प्रत्येकी २०-२० च्या संख्येतील स्वयंसेवकांनी बेलगाव, रनमचन येथे स्वच्छता मोहीम राबविली. या कार्यात अनेकांनी आपले योगदान दिले आहे. या सेवा कार्याची सर्वत्र प्रसंशा होत असली तरी “इदं न मम” म्हणत कार्यकर्ते आपल्या कार्यात कार्यमग्न आहेत. एका संघ गीतात म्हटले आहे, “आजादी के जंग बडेबडे सामान चाहिये| तन भी, मन भी और नौजवान चाहिये || समाजोपयोगी कार्यासाठी तनमनधना सोबत तरुणाईने भरलेले तारुण्य तसेच अंत:स्थ उर्मी आणि सामर्थ्याने ओतप्रोत असे जीवन पाहिजे. कोरोना काळात, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा कार्याची ओळख आंतरराष्ट्रीय समुदयाला झाली आहे. कोरोना बाधित परिसरात योग्य ती काळजी घेवून, आपला जीव धोक्यात घालून, संघ स्वयंसेवक समाजासाठी झटत आहेत, मदत करीत आहेत. कोरोना लसीच्या मानवी परीक्षणासाठी संघाचे असेच काही स्वयंसेवक समोर आले आहेत. संघाचे कार्यकर्ते आपल्या कर्तृत्वाचा गाजावाजा न करता त्यांचे कार्य करीत असतात. “सेवा है यज्ञकुंड संमिधा सम हम जले”, हे ब्रीद उराशी बाळगलेल्या या सर्व सेवाव्रतीचे मनापासून कौतुक, अभिनंदन आणि आभार. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार