सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महसूल, पोलीस, न.प. प्रशासन उतरले एकत्र रस्त्यावर..

संयुक्तिक धडक मोहिमेत अनेकांवर झाली दंडात्मक कारवाई..

Sudarshan MH
  • Apr 19 2021 5:22PM
 
 
(योगेश शर्मा)
बुलढाणा : कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावानंतर संपूर्ण महाराष्ट्रात राज्य शासनाच्या निदर्शनानंतर कडक संचारबंदीचे आदेश देण्यात आले होते. यातच विदर्भातील बुलढाणा जिल्हा हा कोविड१९ च्या प्रादुर्भावात हॉट स्पॉट ठरत असतांना बाजार परिसरात आणि शहरातील मार्गांवर विनाकारण फिरणारी लोकांची गर्दी ही प्रशासनासाठी डोकं दुःखी ठरत आहे. जिल्ह्यातील चिखली शहरात विनाकारण होनारी गर्दी आणि कोविड१९ च्या नियमांचा लोकांकडून होत असलेल्या उल्लंघणाबाबत आज स्थानिक महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन आणि न.प. प्रशासन यांनी संयुक्तिक कारवाई करत आज शहरातील अनेक दुकाने आणि लोकांवर दंडात्मक कारवाई केल्याचे दिसून आले.
 
आज दिनांक १९ एप्रिल रोजी महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन आणि न.प. प्रशासन यांनी संयुक्तिक कारवाई करत शहरातील सर्वच मुख्य रस्ते, बाजार परिसरात आपल्या फ़ौज-फाट्यासह धडक कारवाई केली. या दरम्यान शासनाने कोविड १९ संदर्भात लावून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करतांना शहरातील बरेचशे हॉटेल, दुकाने, फळ विक्रेते तत्सम छोटे दुकानेसुद्धा आढळून आल्याने त्यांच्यावर दंडात्मक स्वरूपाची कारवाई करण्यात आली.
 
विशेष म्हणजे जिल्हाभरात कोविड १९ ने लागण झालेल्यांची संख्या झपाट्याने वाढत असतांना आणि त्याबाबत वेळोवेळी प्रशासनाकडून लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने निर्देश दिले जात असतांना देखील सामान्य लोकांना याबाबतची गंभीरता अजूनही वाटत नसल्याचा भास शहरातील गर्दीला बघून होतोच. महत्त्वाचे म्हणजे आजही मोठ्या प्रमाणात लोक तोंडावर साधा मास्क सुद्धा लावत नसल्याचेही दिसून आले, अश्या लोकांवर देखील आज दंडात्मक कारवाई करण्यात आलेली असली तरी लोकांना स्वतःला देखील आपल्या आणि इतरांच्या आरोग्याची काळजी नाहीच..! हे आज कळून चुकले आहे.
 
आज स्थानिक प्रशासनाच्या संयुक्तिक धडक कारवाई नंतर शहरभरात प्रशासनाच्या बाबतीत भीतीचे वातावरण दिसून आले. दिवसभर सूरु असलेल्या या धडक मोहिमेमुळे शहरात विनाकारण आणि विना मास्क फिरणारी गर्दी कमी झाल्याचे दृश्य समाधानकारक असून लोकांनी स्वतः याबाबत जागरूक असणे फार महत्त्वाचे असून या पुढेही कोविड१९ संदर्भातील नियम लोकांनी स्वतःहुन पाळावे अन्यथा त्यांच्यावर कारवाई नक्कीच करण्यात येणार असल्याचे वक्तव्य चिखलीचे तहसीलदार डॉ. अजितकुमार येळे यांनी केले आहे. तर चिखलीचे ठाणेदार पो.नि. गुलाबराव वाघ म्हणाले की, कोविड १९ च्या नियमांकडे पाठ फिरवनाऱ्या लोकांची गय केली जाणार नाही. लोकांच्या आरोग्यासंदर्भात आणि कोरोना बाबत लावून दिलेल्या नियमांचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन होणार नाही याबाबत आम्ही विशेष लक्ष देऊन आहोत. नियम तोडणारे कोणीही असो, कारवाई होणार म्हणजे होणार..
 
आज झालेल्या या धडक कारवाईत चिखलीचे तहसीलदार डॉ. अजितकुमार येळे, ठाणेदार गुलाबराव वाघ, न.प. मुख्याधिकारी अभिजित वायकोस सह मोठ्या संख्येने तिन्ही विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. आज झालेल्या या कारवाई नंतर लोकांनी सकारात्मक प्रतिक्रिया देतांना पुढील १५ दिवस तरी या पद्धतीची कारवाई होणे गरजेचे असून यामुळे मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घातल्या जाऊ शकते असे मत लोकांनी व्यक्त केले आहे..

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार