सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पुणे विभागातील 5 लाख 91 हजार 731 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.

कोरोना बाधित 6 लाख 21 हजार 268 रुग्ण-विभागीय आयुक्त सौरभ राव.

Sudarshan MH
  • Mar 4 2021 12:01PM
पुणे विभागातील 5 लाख 91 हजार 731 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी;विभागात कोरोना बाधित 6 लाख 21 हजार 268 रुग्ण-विभागीय आयुक्त सौरभ राव.
 
        पुणे, दि. 3 :- पुणे विभागातील 5 लाख 91 हजार 731 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 6 लाख 21 हजार 268 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 166 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 16 हजार 371 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.64 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.25 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
            पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 4 लाख 10 हजार 129 रुग्णांपैकी 3 लाख 90 हजार 473 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 10 हजार 490 आहे. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 166 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.23 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.21 टक्के आहे.
सातारा जिल्हा
              सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 58 हजार 976 रुग्णांपैकी 55 हजार 838 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 285 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 853 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
              सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 53 हजार 120 रुग्णांपैकी 50 हजार 397 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 877 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 846 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 
सांगली जिल्हा
               सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 538 रुग्णांपैकी 46 हजार 594 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 183 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 761 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
            कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 50 हजार 505 रुग्णांपैकी 48 हजार 429 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 331 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 745 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 1 हजार 414 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 211, सातारा जिल्ह्यात 58, सोलापूर जिल्ह्यात 93, सांगली जिल्ह्यात 24 तर कोल्हापूर जिल्ह्यात 28 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण  
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 1 हजार 106 आहे. पुणे जिल्हयामध्ये 987 , सातारा जिल्हयामध्ये 47, सोलापूर जिल्हयामध्ये 50, सांगली जिल्हयामध्ये 6 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 16 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 40 लाख 96 हजार 563 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 6 लाख 21 हजार 268 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार