सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पुणे महाराष्ट्र :सध्या संपूर्ण देशभरात असलेल्या कोरोना च्या पार्श्वभूमीवर जे संकट उभे राहिले आहे ते खूप भयानक आहे. पुणे शहरामध्ये सध्या रक्ताचा साठा खूप कमी आहे. सरकारने वेळोवेळी रक्तदान करा म्हणून आवाहन केले आहे.

पुणे शहरामध्ये सध्या रक्ताचा साठा खूप कमी आहे. सरकारने वेळोवेळी रक्तदान करा म्हणून आवाहन केले आहे.

Sudarshan MH
  • Dec 7 2020 1:55PM
पुणे महाराष्ट्र :सध्या संपूर्ण देशभरात असलेल्या कोरोना च्या पार्श्वभूमीवर जे संकट उभे राहिले आहे ते खूप भयानक आहे. पुणे शहरामध्ये सध्या रक्ताचा साठा खूप कमी आहे. सरकारने वेळोवेळी रक्तदान करा म्हणून आवाहन केले आहे.

त्याच जाणिवेतून प्रेरणा घेऊन “सह्याद्री फाऊंडेशन व सृजनारंभ" यांच्या सहयोगाने "रक्त 24 तास" या उपक्रमा अंतर्गत व री नामदेव मारडकर पुणे शहर पोलीस यांच्या वाढदिवसानिमित्त हा रक्तदानाचा उपक्रम दि. 05 डिसेंबर 2020 रोजी मगरपट्टा चौक, बाश्री हॉटेल समोर, हडपसर येथे पार पडला.
सहयाद्री फाऊंडेशन या संस्थेचे  संस्थापक श्री मोहित काकडे व सृजनारंभ या संस्थेचे संस्थापक श्री नामदेव मारडकर या उपक्रमाचे आयोजक आहेत. तसेच नामदेव मारडकर यांना सामाजिक व सांस्कृतिक कार्याची आवड आहे. तसेच कोरोनामुळे संपूर्ण देशभरात ताळेबंदी होती तेव्हा पोलिस म्हणून आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून एक स्वताची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

तसेच सहयाद्री फाऊंडेशन या संस्थेचे  संस्थापक श्री मोहित काकडे यांचे देखील पुणे विभागात सामाजिक कार्यामध्ये मोलाची कामगिरी बजावत आहेत. 

तरी हडपसर परिसरातील व पुणे शहरातील युवक व नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देऊन 150 लोकांनी रक्तदान केले व सामाजिक बांधिलकी राखली. हा उपक्रम सरकारने वेळोवेळी बजावलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर च्या  नियमानुसार पार पडला.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार