सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाहन ताफ्यातील एक वाहन उलटल्याची घटना आज सकाळी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाहन ताफ्यातील एक वाहन उलटल्याची घटना आज सकाळी अमृतांजन पुलाखाली घडली आहे

Manish Gupta
  • Jun 29 2020 7:43PM
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाहन ताफ्यातील एक वाहन उलटल्याची घटना आज सकाळी अमृतांजन पुलाखाली घडली आहे. सुदैवाने यामध्ये जीवीतहानी झालेले नाही. पण चालकासह एक अधिकारी जखमी झाले आहेत. शरद पवार हे वाहन ताफ्यासह मुंबईच्या दिशेने जात असता हा अपघात घडला आहे.


 
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज (सोमवार) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे आपल्या वाहन ताफ्यासह पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी निघाले होते. मुंबईच्या दिशेने जात असताना पवार यांच्या वाहन ताफ्यातील पाठीमागील पोलिस व्हॅन (एमएच 12 एनयु 5881) ही अचानकपणे उलटली.

त्यामध्ये चालक आणि एक अधिकारी जखमी झाले. पाठीमागील गाडी उलटल्याचे लक्षात आल्यानंतर शरद पवार यांनी गाडी थांबवून अपघातात जखमी झालेल्यांची विचारपूस केली. उपचारासाठी त्यांना हॉस्पीटलमध्ये पाठवण्यात आले आहे. अपघाताची माहिती लोणावळा पोलिसांना कळवण्यात आली आहे. दरम्यान, अपघातामध्ये पोलिस व्हॅनचे नुकसान झाले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार