सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*पुणे-पिंपरी चिंचवड शहर व जिल्ह्यातील सर्वच नद्या मधील जलपर्णी हटवा मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे व पर्यावरणमंञी आदित्य ठाकरे यांच्याकडे - ॲड संजय सावंत पाटील यांची मागणी*

पुणे-पिंपरी चिंचवड- बारामती शहरातुन वाहणाऱ्या मुळा-मुठा पवना इंद्रायणी सारख्या पवित्र नद्यांची गटारे गंगा चालू असून प्रशासनाचे याकडे मात्र कानाडोळा केला असून पर्यावरण विभाग नेमकं करतो काय असा प्रश्न

Sudarshan MH
  • Apr 14 2021 10:27AM
                  प्रतिनिधि:-दिपक चव्हाण
                                     पुणे-पिंपरी चिंचवड- बारामती शहरातुन वाहणाऱ्या मुळा-मुठा पवना इंद्रायणी सारख्या पवित्र नद्यांची गटारे गंगा चालू असून प्रशासनाचे याकडे मात्र कानाडोळा केला असून पर्यावरण विभाग नेमकं करतो काय असा प्रश्न सर्वसामान्य जनता आज पर्यावरण तुम्हाला विचारत आहे या गंभीर समस्या बाबत भारतीय जनता पार्टी चे पुणे जिल्हा कायदा आघाडी चे अध्यक्ष यांनी प्रत्यक्ष इंद्रायणी च्या पात्र मध्ये जाऊन पाहणी केली त्यामध्ये पुणे-पिंपरी चिंचवड शहर इंद्रायणी मुळा-मुठा नदी तसेच पुणे जिल्ह्यातील इतर सर्वच नद्या मधील जलपर्णी हटविणे खुप महत्त्वाचा विषय बनलेला आहे हे निर्देशनात आले...

पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यातील सर्व नद्यांमध्ये जलपर्णीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विशेषतः पुणे शहरा मधून जात असणारी मुळा-मुठा नदी तसेच आळंदी शहरा मधून जाणारी इंद्रायणी नदी मध्ये प्रदूषणा मुळे वाढती अस्वच्छता तसेच त्यामध्ये वाढणारी जलपर्णी आणि त्यामुळे स्थानिक नागरिकांना होणारा त्रास आणि पुढे अनेक महिने होणारे दुष्परिणाम खूप गंभीर आहे.

पुणे शहारा मधून जाणाऱ्या मुळा-मुठा या मुळशी वरून वाहत आलेल्या नदी मध्ये अनेक औद्योगिक व शहरी विभागाच्या परिसरामधून होणारे प्रदूषण सर्वच नदी मध्ये उतरत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात जलपर्णी चा वाढ होत आहे तसेच अनेक किलोमीटर परिसरामध्ये नदी पात्रा जवळ राहणाऱ्या नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे डास स्थानिक परिसरामध्ये डेंगू, मलेरिया, आणि सर्वच रोगराई अतिशय वाढत आहे. असे सर्व होणारे दुष्परिणाम टाळायचे असेल तर लवकरात लवकर नदीच्या पात्र मधील जलपर्णी हटविणे गरजेचे आहे.

पुणे जिल्ह्यातील आळंदी शहरातून वाहत असलेल्या इंद्रायणी नदी सह जिल्ह्यातील सर्व नद्यांच्या प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे. पुणे जिल्ह्यात औद्योगिकरण व शहरी करण झाल्यामुळे इंद्रायणी नदीसह जिल्ह्यातील सर्व नद्या मध्ये प्रदूषण होत आहे. आपणाकडे इंद्रायणी नदी प्रदूषणाचा प्रश्न तातडीने सोडवणे गरजेचे आहे. वारकरी भाविक नागरिक आळंदी देहू इकडे येऊन इंद्रायणीला तीर्थ मानून प्राशन करणारे लाखो वारकरी श्रदाळू या श्रद्धेचा, पोटापाण्याचा तसेच मुक्या आरोग्याचा विचार करून इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करणे गरजेचे आहे.

पाण्यातील ऑक्सिझन चे प्रमाण वेगाने घटत आहे. नद्यांचे एकूण जैविक पर्यावरण पूर्णतः कोलमडून पडले आहे. नद्यांच्या वाढत्या प्रदूषणाचा दुष्परिणाम सार्वजनिक पाणीपुरवठा, शेती मासेमारी, जलपर्यटन, पर्यावरण अशा सर्वच क्षेत्रात स्पष्ट दिसत गेली. अनेक ठिकाणी नदीचा प्रवाह दिसत नाही अशी परिस्तिथी आहे. डासांचा उत्पत्ती साठी पाणथळ जागा आणि त्यावर साचलेली जलपर्णी वनस्पती अनुकूल असते. त्यामुळे नदी काठी डासांचा उपद्रव वाढला आहे. त्यातून थंडी तापाचे रुग्ण वाढत आहे. सध्या पुण्यात कोरोना साथीचा जोर वाढताना दिसतो आहे. थंडी तापाने आजारी पडल्यावर रुग्ण आणि नातेवाईकांत काळजीने वातावरण असते याकरिता युद्धपातळीवर काम करून नदीच्या पात्र मधील जलपर्णी हटविणे गरजेचे आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था त्याच्या पद्धतीने जलपर्णी हटवण्याचे काम करत आहेत. परंतु या वर सयुंक्त प्रयत्न करणे आवश्यक आहे असे वाटते. नद्यां प्रदूषण मुक्त करून पर्यावरण संतुलन राखत लगतचे परिसरात पर्यटन धोरण राबवणे गरजेचे आहे.  राज्य सरकार ने जलपर्णीचा प्रादुर्भाव रोकण्या करिता आधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य यंत्राने चा वापर करून स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, महानगरपालिका यांना बरोबर घेऊन हा प्रश्न राज्य भरात मार्गी लावला पाहिजे आपण स्वतः लक्ष घालून जलपर्णी हटवावी आणि नद्यांचे पर्यावरण राखावे...

          असे निवेदन व विनंती नुकतीच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उध्दवसाहेब ठाकरे व महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंञी मा.श्री आदित्यजी ठाकरे यांना भारतीय जनता पार्टीचे कायदा आघाडीचे पुणे जिल्हा अध्यक्ष ॲड. संजय सावंत पाटील यांनी केली आहे....

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार