सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मोशी भारतमाता चौकात श्री नागेश्वर महाराजांचे प्रवेशद्वार साठी नगरसेवक वसंत बोराटे यांची आयुक्तांकडे मागणी…

महापालीकेच्या वतीने प्रवेशद्वार उभारल्यास मोशी गावच्या वैभवात भर पडणार नगरसेक बोराडे

Abhimanyu
  • Jan 14 2022 3:59PM

प्रतिनिधि :-दिपक चव्हाण पुणे

पिंपरी चिंचवड़- मोशी भारत माता चौकात ग्रामदैवत श्री नागेश्वर महाराजांचे प्रवेश द्वार उभारण्यात यावे या मागणीसाठी भाजप नगरसेवक वसंत बोराटे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे मागणी केली आहे मोशी हे गाव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या देहू,व ,आळंदी च्या मध्यवर्ती ठिकाणी आहे आणि इंद्रायणी सारखी पवित्र गंगा याच मोशी परिसरातून देहू कडून आळंदी कडे वाहते त्यामुळे प्रतिवर्षी देहू आळंदी ला येणारे लाखो वारकरी हे श्री नागेश्वर महाराजांचे दर्शन घेउन देहू आळंदी कडे जात असतात त्यामुळे  देहू–आळंदी कडे जाणारा वारकरी संप्रदाय व तसेच पुणे नाशिक महामार्गावर ये-जा करणाऱ्या नागरिकांना एक भव्य प्रवेशद्वार दिसावे. यासाठी  महापालीकेच्या वतीने प्रवेशद्वार उभारल्यास मोशी गावच्या वैभवात भर पडनार असल्याचे म्हटले आहे.

महापालिकेच्या माध्यमातून तयार होणारे श्री नागेश्वर महाराजांचे प्रवेशद्वार देहू – आळंदी रस्त्यावरील भारतमाता चौकात उभे करावे, अशी सर्व गावकऱ्यांची मागणी आहे. त्या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून माझीदेखील तीच भूमिका असून याठिकाणी श्री नागेश्वर महाराजांचे प्रवेशद्वार मोशीतील भारतमाता चौकात उभारण्यात यावे, असे महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात बोराटे यांनी म्हटले आहे

 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार