1जानेवारे विजयस्तंभास अभिवादन कार्यक्रमाच्या नियोजनाबाब जिल्हाधिकारी डाँ.देशमुख यांनी घेतली आढावा बैठक
विविध संघटनासोबतच लवकरच घेनार बैठक:-जिल्हाधिकारी
प्रतिनिधि:-पुणे
पुणे- हवेली तालुक्यातील पेरणे फाटा येथील विजयस्तंभास १ जानेवारी २०२२ रोजी अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या सुविधा तसेच नियोजनाबाबत जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला.
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, पेरणे येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी दरवर्षी 1 जानेवारी रोजी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय येत असतो. गतवर्षी कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मर्यादीत होती. यावर्षी अधीक संख्येने नागरिक येण्याची शक्यता लक्षात घेता संबधित यंत्रणांनी तातडीने आवश्यक नियोजन करावे. विभागातील सबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्यासमवेत करावयाच्या कामाबाबत पाहणी करून कामे वेळेत होतील,याची दक्षता घ्यावी.तसेच वाहतुकव्यवस्था,प्रकाशव्यवस्था, रस्ते दुरूस्ती, विद्युतव्यवस्था आदी आवश्यक कामे तातडीने पुर्ण करावीत असे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिले.शतसेच कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत विविध संघटनासोबतच लवकरच बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
बैठकीस पुणे पोलीस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ, अभिनव देशमुख,निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मतराव खराडे,अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण आदी उपस्थित होते.पुणे पोलिस सह पोलिस डॉ.शिसवे आणि पोलीस अधीक्षक श्री.देशमुख यांनीदेखील नियोजनाबाबत सूचना दिल्या.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प