सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आळंदी पोलिसाचे कोंबिंग ऑपरेशन एका सराईत गुन्हेगारा कडून चार पिस्टल चार जिवंत काडतुसे केली हस्तगत

चार पिस्टल चार जिवंत काडतुसे केली हस्तगत

Abhimanyu
  • Oct 11 2021 10:03PM

प्रतिनिधि :-दिपक चव्हाण पुणे

पिंपरी-चिंचवड शहरातील  सराईत गुन्हेगार व तडीपार व तडीपारी कालावधी पूर्ण करून आलेल्या सराईत गुन्हेगारावर व रेकॉर्डवरील आरोपी वर हे पाळत ठेवत त्यांच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवण्याबाबत व कोम्बिंग ऑपरेशन राबविण्याच्या सूचना पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश व अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे यांनी आयुक्तालयाच्या संबंधित असलेल्या सर्व पोलिस ठाण्यांना दिले असताना आळंदी पोलीस ठाण्या चे वरिष्ठ पोलीस निरीक्ष च्या मार्गदर्शनाखाली गुन्हे तपास पथकाने आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोळू गावात राहत असलेल्या एक सराईत गुन्हेगार पाळत ठेवून त्याला अटक केली असताना त्याची त्याची कसून चौकशी केली असता यांच्याकडून चार पिस्टल व चार जिवंत काडतुसे आसा एकूण1,22,000/ रुपयांची हत्यारे हास्तगत करण्यात आली आहे....

याबाबत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परिषदे मध्ये दिलेल्या माहितीनुसार पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सध्या सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवण्याच्या सूचना दिली असताना आळंदी पोलीस ठाण्याचे गुन्हे तपास पथकाचे पोलिस अधिकारी व अंमलदार रेकॉर्डवरील आरोपीवर पाळत ठेवून होते त्या अनुषंगाने दिनांक 7/10/ 2019 रोजी आळंदी पोलीस यातील गुन्हे तपास पथकातील पोलिस अमलदार बाळासाहेब खेडकर यांना बातमीदार मार्फत  गोपनीय माहिती मिळाली की सोळू गावातील तडीपारी कालावधि पुर्ण करून आलेला  आरोपी सोमनाथ प्रकाश पाटोळे वय 27 हा सोळू गावातील दर्ग्याजवळ आला आसुन त्याच्या पाठिवर सँगमध्ये पिस्टल आसुन तो सध्या पिस्टल विक्रीचा व्यावसाय करत असल्याची माहिती मिळाली असता त्याची खात्री करून  गुन्हे तपास पथकाचे उप निरीक्षक जोंधळे व त्यांच्या गुन्हे तपास पथकाने  यशस्वीपणे हे कोंबींग ऑपरेशन करून ह्या सराईत गुन्हेगारास ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता ना त्याच्या जवळ  असलेल्या सँगमध्ये 1,22,000,रू.कीमतीच्या4पिस्टल व4जिवंत काडतुसेहस्तगत करण्यात आलीआसुन आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले सदर व न्यायालयाने आरोपीला 6 दिवसांची पोलिस कस्टडी रिमांड दिली असून आरोपी हा किती दिवसापासून हा व्यवसाय करत होता याचा पुढील तपास आळंदी पोलिस करीत आहे

सदर कार्यवाही पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश व अप्पर पोलीस आयुक्त डॉक्टर संजय शिंदे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1चे मंचक इप्पर,सह पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे पोलीस उपनिरीक्षक जोंधळे पो.ह.आर.एम.लोणीकर, पो.ना.बी.बी.सानप.पो.शि.बी.व्ही.खेडकर,एन.के.साळुंके के.सी.गर्जै,जी.व्हि.आढे याच्या टीम ने केली आहे...

 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार