सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पिंपरी चिंचवड़ शहरात महावितरण विभागाचा भोगळ कारभारा मुळे मोशी विभागीय कार्यालयावर महाविकास आघाडीचा कंदील मोर्चा

महावितरण विभागाचा भोगळ कारभारा

Abhimanyu
  • Oct 4 2021 9:24PM

प्रतिनिधि:- पुणे

पिंपरी-चिंचवड शहर स्मार्ट सिटी च्या नावाने ओळखले जाणारे शहरांमध्ये महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून गेल्या काही महिन्यांपासून मोशी, जाधववाडी,डुडूळगाव , परिसरात महावितरण कंपनी कडुन विजेचा पुरवठा खंडित होत असल्याने परिसरातील छोटे-मोठे लघुउद्योजकांना मोठा सामना करावा लागत आहे त्याचबरोबर सर्व सामान्य नागरिकही हैराण झाले आसुन याबाबत अनेक वेळा महावितरण विभाग आला पत्रव्यवहार करून देखील महावितरण विभागाकडुन कुठल्या प्रकाराची दखल घेण्यात आली नसून आज अखेर महावितरण विभागाच्या विभागीय  कार्यालयावर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून कंदील मोर्चा काढून महावितरण विभागाच्या कारभाराचा निषेध व्यक्त करण्यात आला 

महाविकास आघाडी च्या वतीने महावितरण विभागाचे अभियंता  यांच्याकडे निवेदन देऊन लवकरात लवकर मोशी डुडळगाव जाधववाडी परिसरातील वीज पुरवठा नियमित होण्यासाठी व स्वतंत्र सबस्टेशन उभारण्यात यावे अशी मागणी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली त्याचबरोबर महावितरण विभागाचे अभियंता यांनी निवेदन स्वीकारून आपल्या मागे मिनी व लवकरात लवकर उपमुख्य मंत्री पालक मंत्री यांच्यासोबत बैठक करून लवकरात लवकर आपल्या मागण्यांची पूर्तता करण्यात येईल असे आश्वासन यावेळी देण्यात आले।

हे आंदोलन शिवसेने चे भोसरी विधानसभा अध्यक्ष मा. नगरसेवक धनंजय आल्हाट, राष्ट्रवादी काँग्रेसचे मा. स्थायी समिती अध्यक्ष नगरसेवक अजित गव्हाणे, यांच्या खाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते ते ह्या मोर्चामध्ये मा. नगरसेवक अरूण बो-हाडे, मा.नगरसेवीका मंदाताई आल्हाट ,योगेश बोराटे ,संजय लडकत, रूपाली आल्हाट, विकास साने, कविता आल्हाट, आतिश बारणे, नितीन सस्ते, गणेश सस्ते, राहुल बनकर, संतोष बोराटे, दिलीप बो-हाडे, ज्ञानेश्वर बो-हाडे, केदार गव्हाणे आशिष आल्हाट , मयूर कुदळे ,रोहित आल्हाट, गणेश आल्हाट व महाविकास आघाडीतील असंख्य कार्यकर्ते व स्थानीय नागरीक उपस्थित होते.


सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार