सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पुण्यात घरात घुसून धर्मांतराचा प्रयत्न; धर्मप्रचारकांवर चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

गीतेचे वाचन करण्यापेक्षा बायबलचे वाचन करा, असे म्हणत घरात घुसून हातामध्ये बायबल ठेवत ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याबाबत जबरदस्ती करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

Shruti Patil
  • Jun 16 2024 12:48PM

पुणे: ख्रिस्ती धर्म स्वीकारला तर, तुमचे आयुष्य चांगले जाईल. तुमच्या सगळ्या व्याधी दूर होतील. गीतेचे वाचन करण्यापेक्षा बायबलचे वाचन करा, असे म्हणत घरात घुसून हातामध्ये बायबल ठेवत ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याबाबत जबरदस्ती करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या धर्मप्रचारकांनी मूर्तिपूजा करु नका, असे सांगत धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास विडी कामगार वसाहतीमध्ये घडला.

 
याप्रकरणी प्रेरणा दिलीप भंडारी (वय २५, रा. शनी मंदिराशेजारी, विडी कामगार वसाहत, चंदननगर) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी रीना रामदास मनसा (वय ५०, रा. गंगापुरम सोसायटी, दोराबजी मॉलसमोर, विमाननगर), एलिसा रमेश आल्फ्रेड् (वय ७०, रा. साईकृपा सोसायटी, वडगाव शेरी), रिबेका अनुराज सिगामनी (वय ४८, रा. अनुराज बालाजी उद्यमनगर, वडगाव शेरी), शारदा जगदीश सोदे (रा. ओम गंगोत्री सोसायटी, गुरुद्वारा गल्ली, वडगाव शेरी), प्रिया राजू सिंगामनी (वय ४५, रा. सुनीतानगर, संकल्प सोसायटी, वडगाव शेरी) यांच्याविरुद्ध भादंवि १४१, १४३, ४५२, २९५-अ, २९८ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
 
 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार