सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

एनआयएचे पथक पुण्यात; दहशतवाद्याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार एनआयएन ची कारवाई

२० एप्रिल रोजी एनआयएचे पथक पुण्यात आले. पुण्यातील कोंढव्यात दहशतवादी रहात असताना त्यांनी वापरलेली वाहने शनिवारी पहाटे जप्त करण्यात आली आहेत.

Shruti Patil
  • Apr 20 2024 10:22AM

पुणे: राष्ट्रीय तपास संस्थेचे पथक पुणे शहरात दाखल झाले आहे. राष्ट्रीय तपास संस्था आणि महाराष्ट्र एटीएसच्या पथकाने शनिवारी पहाटे पुणे शहरात कारवाई केली आहे. या कारवाईमुळे खळबळ माजली आहे. दहशतवाद्याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार एनआयएने ही कारवाई केली. या दहशतवाद्यांनी पुणे शहरात राहत असतांना वापरलेली वाहने एनआयने जप्त केली आहे.

काही दिवसांपूर्वी पुण्यातील कोंढवा भागातून इसीस या संघटनेशी संबंधित मोहम्मद युनुस साकी, इम्रान खान आणि मोहम्मद युसूफ खान या दहशतवाद्यांना अटक केली होती. या दहशतवादी संघटनेचे मोठे मॉड्युल एनआयएने उद्ध्वस्त करण्यात आले होते. त्यावेळी पळून जाण्यात यशस्वी ठरलेल्या मोहम्मद शाहनवाज यालाही पुढे अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीतून इसीस संघटनेशी संबंधित इतरही अनेक जणांना अटक करण्यात आली. त्याचबरोबर हे दहशतवादी कोढंव्यातील ज्या घरात भाड्यानं रहात होते, ती इमारतही जप्त करण्यात आली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार