सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरुन शिवसेनेचे आमदा राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्या आखेर मंत्रिपदाचा राजीनामा.

राज्याचे वादग्रस्त वनमंत्री संजय राठोड राजीनामा देणार का, याच्यावर जोरदार चर्चा सुरु होती. अधिवेशनापूर्वी राठोड राजीनामा देतील अशी शक्यता होती, ती खरी ठरली आहे.

Sudarshan MH
  • Feb 28 2021 5:56PM
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरुन शिवसेनेचे आमदा राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्या आखेर मंत्रिपदाचा राजीनामा. 
 
प्रतिनिधि - दिपक चव्हाण पुणे
राज्याचे वादग्रस्त वनमंत्री संजय राठोड राजीनामा देणार का, याच्यावर जोरदार चर्चा सुरु होती. अधिवेशनापूर्वी राठोड राजीनामा देतील अशी शक्यता होती, ती खरी ठरली आहे. उद्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे आजच वन मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत हालचाली सुरु होत्या.अखेर वन मंत्री संजय राठोड यांनी आपल्या वनमंत्री पदाचा राजीनामा दिला.
संजय राठोड यांच्या राजीनाम्यामुळे मंत्रीमंडळात बंजारा समाजाचं असलेलं प्रतिनिधीत्व कमी झालं आहे. हे भरून काढण्यासाठी मंत्रीपदासाठी आता विदर्भातील आणखी एका मंत्र्याचं नाव चर्चेत आलं आहे.
बंजारा समाजाचं नेतृत्व असलेले संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर बंजारा समाजात (भटके व विमुक्त समाज) निराशा पसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 
बंजारा समाजाच्या मोठ्या नेतृत्वाला धक्का लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही काही जणांकडून केला जात आहे
त्यामुळे राठोड यांच्या राजीनाम्यानंतर बंजारा समाज नाराज होऊ नये यासाठी महाविकास आघाडीकडून डॅमेज कंट्रोल करण्यासाठी प्रयत्न सुरू झाल्याचं समजतं.
पूजा चव्हाण प्रकरणाच्या मदतीने समाज माध्यमातून, प्रसार माध्यमातून बंजारा समाजाची आणि माझी प्रतीमा खराब करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पूजा चव्हाणच्या प्रकरणाचा तपास व्हावा आणि सत्य बाहेर यावी ही आपली इच्छा असल्याची संजय राठोड यांनी म्हटलं आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार