सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

चाकूरच्या सीमा सुरक्षा दलात सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन देऊ खा.सुधाकर श्रृंगारे

चाकूर येथील सीमा सुरक्षा दलात सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील असा विश्वास खासदार सुधाकरराव श्रृंगारे यांनी सीमा सुरक्षा दलास दिलेल्या भेटीदरम्यान दिला. यावेळी खा. सुधाकरराव श्रृंगारे यांनी सीमा सुरक्षा दलास भेट देऊन तेथील अडचणी,समस्या जाणून सर्व ठिकाणच्या स्थळाची पाहणी केली.

S.n.ranjankar
  • Jun 25 2021 5:08PM

 

 चाकूर दि २४ येथील सीमा सुरक्षा दलात सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील असा विश्वास खासदार सुधाकरराव श्रृंगारे यांनी सीमा सुरक्षा दलास दिलेल्या भेटीदरम्यान दिला.
यावेळी खा. सुधाकरराव श्रृंगारे यांनी सीमा सुरक्षा दलास भेट देऊन तेथील अडचणी,समस्या जाणून सर्व ठिकाणच्या स्थळाची पाहणी २३ रोजी केली.
यावेळी केंद्रीय सीमा सुरक्षा दलाचे महानिदेशक प्रवीणजी राठोड हे सोबत होते.सीमा सुरक्षा दलातील प्रशिक्षण स्थळी जवानांना भेटून चर्चा केली. त्यांच्याकडून त्यांच्या समस्या अडचणी प्राधान्याने ऐकून घेऊन सीमा सुरक्षा दलाच्या विकासाच्या दृष्टीने केंद्र सरकारकडे आवश्यक बाबींचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
महानिदेशक प्रविण राठोड यांनी चाकूरपासून सीमा सुरक्षा दलापर्यंतचा नवीन रस्ता व त्यांचे रुंदीकरण करुन रस्त्यांचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली.त्याबरोबरच तेथील कँम्पसमध्ये पाण्यासाठी स्वतंत्र इक्सप्रेस फिडरची व्यवस्था करुन पाण्याचा प्रश्न व ११५ कुटुंबाचे तेथे वास्तव्य असून बालकांसाठी खुली व्यायामशाळा,आर ओ प्लान्ट देण्यात यावा अशा प्रमुख मागण्यासह इतरही काही समस्या खा.सुधाकर श्रृंगारे यांच्याकडे मांडल्या त्यावर खा.श्रृंगारे यांनी येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात सर्व मागण्या प्राधान्याने सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचा विश्वास दिला.
यावेळी खा.श्रृंगारे यांनी प्रशासकीय कार्यालय, परेड ग्राउंड,शिकवणी वर्ग,मेसमध्ये जे जेवण जवानांना दिले जाते त्याची स्वतः तपासणी करुन विविध ठिकाणची पाहणी केली.यावेळी खा.सुधाकर श्रृंगारे यांचा सीमा सुरक्षा दलाच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी सीमा सुरक्षा दलाचे महानिरीक्षक प्रविण राठोड व्दितिय कमान अधिकारी कपील चव्हाण,सहायक समादेष्टा विनोद तांदळे,चेतन पाखले,राहुल खजूरीया आदीसह भाजपा तालुकाध्यक्ष शिवाजीराव बैनगिरे, वसंतराव डिगोळे,अशोकदादा चिंते,उपनगराध्यक्ष नितीन रेड्डी, सिद्धेश्वर पवार,संतोष माने,मधुकर मुंडे, श्रीमंतराव शेळके, रणजित मिरकले आदीजण उपस्थित होते.   

खा.सुधाकर श्रृंगारे यांनी केंद्रीय विद्यालयास भेट दिली. तेथील विद्यालयाच्या नवीन इमारत बांधकामाची पाहणी करुन समस्या जाणून घेतली. केंद्रीय विद्यालयात विद्यार्थ्यांना  पिण्याच्या पाण्यासाठी आर ओ प्लान्ट,आँनलाईन शिकवणीमुळे नेटवर्कची समस्या अभावी विद्यार्थ्यांना शिक्षणात बाधा होत असून त्यासाठी स्वतंत्र टाँवर उभारणी, विद्युतीकरणासाठी स्वतंत्र कनेक्शन,केंद्रीय विद्यालय गेटपासून चाकूरपर्यंत रस्ता व त्यांचे रुंदीकरण,विद्यार्थ्यांसाठी खेळाचे मैदान,४० काँम्प्युटर्स,खुली व्यायामशाळा अशा आवश्यक बाबींची मागणी विद्यालयाचे प्राचार्य जी पी डी क्रिस्टी यांनी केली.यावेळी खा.श्रृंगारे यांनी नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झालेले आहे त्याचे उद्घाटन लवकरच करुन विद्यार्थ्यांना नवीन इमारतीमध्ये शिक्षण घेण्यासाठी ते दालन खुले करण्यात येईल असा विश्वास देऊन विद्यालयातील गुणवत्तेबद्दल चर्चा केली.तेथील आवश्यक लागणाऱ्या सोयी सुविधा लवकरच उपलब्ध करण्यात येतील असा शब्द दिला.

यावेळी तेथील परिसरात खा.सुधाकर श्रृंगारे यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले.यावेळी शेख रियाज,सतीश फुलारी,कुशाल सिंह शेख खुरशीद,तहसिलदार डॉ शिवानंद बिडवे, पोलीस निरिक्षक सोपान सिरसाठ,मार्केट कमिटीचे उपसभापती अशोक चिंते,भाजप तालुकाध्यक्ष शिवाजी बैनगीरे, शंकर श्रृंगारे, उपनगराध्यक्ष नितीन रेड्डी,वसंतराव डिगोळे,सिद्धेश्वर पवार,संतोष माने,मधुकर मुंडे,श्रीमंत शेळके,रणजीत मिरकले आदीजण उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार