सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

दलित वस्तीचे कामे तात्काळ करणे बाबत भिम नगर मधील नागरिकांनी दिले निवेदन

चिखली येथील भीम नगर वार्ड क्रमांक २० ,२१ येथील फुले आंबेडकर वाटीकेच्या बाजूला

Sudarshan MH
  • Feb 11 2021 6:22AM
 
(योगेश शर्मा)
बुलढाणा : चिखली येथील भीम नगर वार्ड क्रमांक २० ,२१ येथील फुले आंबेडकर वाटीकेच्या बाजूला असलेले गेट क्रमांक एक येथे सांची स्तूपची प्रतिक्कृती असलेल्या गेटचे काम तात्काळ सुरू करणे, फुले, आंबेडकर वाटिकाचे सुशोभिकरण करून या वाटिकेत इलेक्ट्रीक लोखंडी पोल, डि.पी हटवणे तसेच सिद्धार्थ नगर मधील अपूर्ण काम तात्काळ पूर्ण करा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन अथवा आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा प्रशांत भटकर, बाळू भिसे, प्रशांत डोंगरदिवे यांनी येथील दीडशे नागरिकांच्या सह्या घेऊन मुख्याधिकारी नगरपरिषद चिखली यांना निवेदनाद्वारे दिलेला आहे.
 
सदर निवेदनात सांगितले आहे की, सन २०१४ ते २०१८ पासून मुख्य अधिकारी नगर परिषद चिखली यांना वरील मागण्या संदर्भात निवेदन देण्यात आले. भीम नगर मधील वार्ड क्रमांक २०, २१ गेट क्रमांक एक साची स्तूप या स्वरूपाचे गेट दगडी कोरीव काम करणे बाबत तसेच फुले आंबेडकर वाटिकाचे सुशोभीकरण ढासळलेले आहे, ती दुरुस्त करणे तसेच वाटीकेमध्ये दिवसा सुरक्षा रक्षक कायमस्वरूपी नियुक्त करणे, सीसी टीव्ही कॅमेरे लावणे, वाटिकेतील विद्युत डीपी हटवणे, दोन विद्युत पोल हटवणे तसेच सिद्धार्थ नगर मधील वाटिकाचे काम संथ गतीने सुरू असल्याकारणाने ते तात्काळ पूर्ण करणे यासंदर्भात वारंवार निवेदने देऊन सुद्धा अद्याप पर्यंत कोणतीही कारवाई झालेले नाही. यासंदर्भात वारंवार प्रशांत भटकर यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. परंतु अद्याप पर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही. संबंधित काम करण्यास टाळाटाळ होत असल्याने नाईलाजास्तव आज भिम नगर सिद्धार्थ नगर मधील नागरिकांनी एकत्र येऊन मुख्याधिकारी नगरपरिषद यांना निवेदन दिले आहे की, येत्या पंधरा दिवसाच्या आत तात्काळ कामे सुरू करावे अन्यथा लोकशाही मार्गाने आमरण उपोषण अथवा विविध आंदोलन छेडण्याचा मार्ग पत्करावा लागेल. मग होणाऱ्या सर्व परिणामास संबंधित शासन प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील असे निवेदनाद्वारे कळविले आहे.
 
निवेदन देते वेळी प्रशांत भटकर, बाळू भिसे, प्रशांत डोंगरदिवे, श्याम पवार, वसंता अवसरमोल, राजेंद्र सुरडकर, गौतम घेवंदे, प्रविण भंडारे, प्रभास जाधव, आकाश बनसोडे, आतिष जाधव यांच्यासह भिमनगर मधील दीडशे बौध्द बांधवांनी स्वाक्षरी केलेले निवेदन दिले आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार