सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

प्रिमियर कंपनीत अनुचित कामगार प्रथेने घेतला कामगाराचा बळी.

ईटिपी हेल्परचे कामकरणार्‍या राजेश साहू, २४ यास लोडरच्या कामावर जबरदस्ती लावल्याने झालेल्या अपघातात मृत्यू

Sudarshan MH
  • Feb 28 2021 10:14AM
प्रिमियर कंपनीत अनुचित कामगार प्रथेने घेतला कामगाराचा बळी. "ईटिपी हेल्परचे कामकरणार्‍या राजेश साहू, २४ यास लोडरच्या कामावर जबरदस्ती लावल्याने झालेल्या अपघातात मृत्यू"
तारापूर - तारापूर औद्योगिक क्षेत्रातील में. प्रिमियर इंटरमिडीएट प्रा.लि. प्लाट नं. टि-५५,५६ व ५७ या कंपनीत दि.२६ रोजी रात्रपाळीत कामावर गेलेला कामगार राजेश किर साहू, २४ हा तिवारी नावाच्या ठेकेदाराच्या कॉन्ट्रॉक्टमधे मागील अनेक वर्षापासून ईटिपी हेल्परचे काम करत होता. कालरात्री ८:०० वाजताच्या सुमारास कंपनीतील माल बाहेर पाठविण्यासाठी (ट्रक क्रं. MH 48 AY 3288) आला होता. या ट्रकमधे २०० लि. क्षमतेचे प्लास्टीक ड्रम भरण्यासाठी प्रशिक्षित लोडर (माथाडी कामगारांऐवजी) कंपनीतील केमिकल उत्पादन कामात हेल्परचे काम करणार्‍या तिवारी या ठेकेदाराच्या ठेकेदारीतील कामगारांकडून लोडींगचे काम करून घेतले जात होते. याकामासाठी ईटिपी प्लान्टवर हेल्परचे कामकरणार्‍या राजेश यास कंपनीसुपरवायझार यादव याने जबरदस्ती लावल्याचे त्याच्या सहकारी कामगारांनी सांगितले. प्रथम त्याने या कामास नकार दिला होता. परंतु कंपनी सुपरवायझर यादव यांनी ठेकेदार तिवारी यास फोन लावून राजेश या कामास नकार देत असल्याबाबत फोन केला यावर ठेकेदाराने त्याला कामावरून कमी करण्याची धमकी देत त्यास जबरदस्ती लोडींगचे काम करण्यास भाग पाडल्याचे त्याच्या सहकारी कामगारांनी माहिती दिली असून, या ट्रकमधे ड्रम लोडिंग करत असताना केमिकलने भरलेला ड्रम त्यांच्या आंगावर पडल्याने त्यास उपचारार्थ तारापूर एमआयडीसीतील तुंगा हॉसिटलमधे दाखल केले असता डाँक्टरांनी त्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. 
 प्रिमियर इंटरमिडीएट ही कंपनी मनिष संघवी व आशिष संघवी यांच्या मालकीची असून १९८९ पासून या कंपनीत ऑर्गानिक केमिकल्स, डाईज इंटरमिडीएट इत्यादी केमिकलचे उत्पादन घेतले जाते. या कंपनीत जवळपास २५-३० कामगार काम करित असून या कंपनीत सुरक्षा नियमांचे उल्लंघन व अनुचित कामगार प्रथेमुळे वारंवार आशा दुर्घटना होत असतात.
तर राजेश साहू हा मुळचा बिहार दरभंगा जिल्ह्यातील होता. त्याचे दिड वर्षा पूर्वीच लग्न झाले होते आणि मागील आठवड्यातच त्याला कन्यारत्नाची प्राप्ती झालेली होती. अनुचित कामगार प्रथेमुळे त्याचा मृत्यू झाल्याने कामगार वर्गातून हळहळ व्यक्त केली जात असून, तारापूर औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या अपघातांमुळे कामगारांमधे भितीचे वातावरण असून, कामगारांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय विभागाच्या कार्य पद्धतीवर नेहमीच प्रश्न चिन्ह उपस्थित होत असते. मात्र आशा दुर्घटेनंतर हळहळ व्यक्त होते तेवढ्यापुरता आवाज उठतो आणि पुन्हा सर्व काही "जैसे थे" ....

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार