सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार - प्रत्येक रेल्वे स्टेशनवरील शौचालयात हिंदुस्थान लिहलेले टॉयलेट कमोड तात्काळ हटविण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

प्रत्येक रेल्वे स्टेशनवरील शौचालयात हिंदुस्थान लिहलेले टॉयलेट कमोड तात्काळ हटविण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा हिंदु सेवा सहाय्य समितीने रेल्वे महाप्रबंधक यांना दिला होता.

Sudarshan MH
  • Feb 26 2021 3:10PM
नंदुरबार -  प्रत्येक रेल्वे स्टेशनवरील शौचालयात हिंदुस्थान लिहलेले टॉयलेट कमोड तात्काळ हटविण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा हिंदु सेवा सहाय्य समितीने रेल्वे महाप्रबंधक यांना दिला होता. याची तात्काळ दखल घेऊन जळगाव ते उधना दरम्यान असलेल्या सर्व शौचालय कमोडवर लिहलेले हिंदुस्थान नाव हटविल्याविषयीचे पत्र रेल्वे प्रशासनाने हिंदु सेवा सहाय्य समितीला दिले आहे. 
पश्चिम रेल्वे महाप्रबंधक अलोक बंसल हे दि.२ फेब्रुवारी रोजी नंदुरबार येथे आले असताना हिंदु सेवा सहाय्य समितीने त्यांची भेट घेऊन कमोडवर हिंदुस्तान नाव लिहलेले हटविण्याविषयी निवेदन दिले होते. या निवेदनाची पश्चिम रेल्वे प्रशासनाने  दखल घेत जळगाव ते उधना या मार्गावरील सर्व रेल्वे स्टेशनवरील हिंदुस्थान लिहलेले ८९ कमोडवरील नाव हटविले असल्याचे पत्र दिले असून छायाचित्रही हिंदु सेवा सहाय्य समितीला पाठविले आहे. या देशाचे एक नाव हिंदुस्थान ही आहे असे असतांना ज्या कमोडवर शौच किंवा लघवी केली जाते त्याठिकाणी हिंदुस्थान हा शब्द लिहणे म्हणजे समस्त देशवासियांचा अपमान आहे. तसेच  हिंदुस्थान  या शब्दाचा अर्थ म्हणजे हिंदु राहत असलेले स्थान असेही होते कमोडवर हिंदुस्थान नाव लिहल्याने देशाचा नावाबरोबर समस्त हिंदु धर्मीयांचाही घोर अपमान आहे. यासाठी रेल्वे अंतर्गत येणाऱ्या सर्व रेल्वे स्थानक तसेच रेल्वे अंतर्गत येणाऱ्या सर्व कार्यालयामधून हिंदुस्थान लिहलेले कमोड त्वरित हटवावे अशी मागणी केली होती त्याची दखल घेत  कारवाई करण्यात आली आहे. हिंदु सेवा सहाय्य समिती अधिवक्ता यांचा मार्फत कमोड बनविणारी कंपनी यावरही कायदेशीर कारवाईची प्रक्रिया करत आहे.तसेच भारतातील सर्व ठिकाणांवरून हे कमोड हटत नाही तोपर्यंत लढा सुरू राहणार असल्याचे हिंदु सेवा सहाय्य समितीचे डॉ. नरेंद्र पाटील, सुमित परदेशी, जितेंद्र राजपूत, कपिल चौधरी, मयुर चौधरी, पंकज डाबी यांनी कळविले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार