सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अदर पूनावाला धमकी प्रकरण : महाराष्ट्र पोलीस मुळापर्यंत जाऊन शोध घेणार

सीरम इन्स्टिटय़ूटचे अदर पूनावाला यांना मिळालेल्या धमकी प्रकरणाच्या मुळापर्यंत पोलिस शोध घेतील. भारताबाहेर तपास करण्याचीही महाराष्ट्र पोलिसांची क्षमता आहे.

Sudarshan MH
  • May 3 2021 12:23PM


सीरम इन्स्टिटय़ूटचे अदर पूनावाला यांना मिळालेल्या धमकी प्रकरणाच्या मुळापर्यंत पोलिस शोध घेतील. भारताबाहेर तपास करण्याचीही महाराष्ट्र पोलिसांची क्षमता आहे. मात्र त्यासाठी पूनावाला यांनी कोणत्या क्रमांकावर धमकीचा फोन आला, कोणाकडून मिळाला याची सविस्तर माहिती पोलिसांना द्यावी. धमकी देणारा कोणीही असला तरी कारवाई केली येईल, असे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.

देसाई म्हणाले,की सीरम इन्स्टिटय़ूटचे प्रमुख अदर पूनावाला यांना करोना लसीसाठी धमकी मिळाल्यानंतर त्यांना राज्य सरकारने ‘वाय’ दर्जाची सुरक्षा दिली आहे. त्यांच्या सुरक्षेबाबत कुठलीही चूक होऊ देणार नाही. त्यांना योग्य ती सुरक्षा पुरविण्यात येईल.

पूनावाला हे सध्या परदेशात असल्याचे समजते. त्यांनी त्यांच्या कोणत्या मोबाइल क्रमांकावर त्यांना धमकी देण्यात आली याची माहिती महाराष्ट्र पोलिसांना द्यावी. त्यावरून आरोपींचा शोध घेण्यास महाराष्ट्र पोलिस सक्षम आहेत. धमकी देणारा कुणीही असो, त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. त्यासाठी पूनावाला यांनी महाराष्ट्र पोलिसांना वेळ द्यावा, असेही देसाई म्हणाले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार