सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*संस्थाचालकाच्या मुलाचे अपहरण करून मागितले वीस लाखांची खंडणी*

संभाजीनगर वाळुज एमआयडीसी क्षेत्रातील बजाज नगर एका इंग्लिश माध्यमिक शाळाच्या संस्थाचालकाच्या मुलाचे अपहरण करून वीस लाखाची खंडणी मागणाऱ्या खंडणीखोर याला पोलिसांनी अटक केली

Sudarshan MH
  • Apr 12 2021 3:56PM

संभाजीनगर वाळुज एमआयडीसी क्षेत्रातील बजाज नगर एका इंग्लिश माध्यमिक शाळाच्या संस्थाचालकाच्या मुलाचे अपहरण करून वीस लाखाची खंडणी मागणाऱ्या खंडणीखोर याला पोलिसांनी अटक केली असून या खंडणीखोराच्या तावडीतून मुलाला सुखरूप सोडून घेतले आहे. ही माहिती मिळताच पोलीस आयुक्तांसह सर्व अधिकाऱ्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. ही घटना सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली होती.
यासंदर्भात पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बजाज नगरात सनराइज् इंग्लिश स्कूल आहे. या इंग्लिश स्कूलच्या संस्थाचालकाच्या जवळपास आठ वर्षाच्या मुलाचे याच संस्थाचालकांच्या इमारतीमध्ये भाड्याने राहत असलेल्या भाडेकरूने अपहरण केले होते. कारण केल्यानंतर त्याच्या आईला फोन करून वीस लाखाची खंडणी मागितली होती आपल्या मुलाचे अपहरण झाल्याने त्या महिलेने याबाबतची माहिती पोलिसांना दिली‌. पोलिसांना माहिती मिळताच सापळा रचून त्या खंडाने पोराला फोनवर कुठलाही संशय न येता पैसे देण्याचे कबूल केले पैसे देण्याच्या बहाण्याने त्यांना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले व त्या मुलाला सोडून घेतले दरम्यान या गुन्ह्याची माहिती मिळताच पोलीस आयुक्त निखील गुप्ता सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत सराफ पोलिस उपायुक्तांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

कर्जबाजारी मुळे केले अपहरण
संस्थाचालकांच्या इमारतीमध्ये भाड्याने राहत असलेला हा अपहरण करतात कर्जत बुडाला आहे. तो मुळचा नांदेड जिल्ह्यातील असल्याची माहिती सूत्रांनी दिली आपल्या वरील कर्ज भेटण्यासाठी त्याने संस्थाचालकांच्या आपल्या घरमालकाच्या आठ वर्षाच्या मुलाचे अपहरण केल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

आरोपी गुन्हेगार प्रवृत्तीचा
अपहरण करता आरोपी हा गुन्हेगार प्रवृत्तीचा असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीला देण्यासाठी वीस लाख रुपये तयार करून ते एका बॅगमध्ये भरून आरोपीला देण्याचे ठरले होते. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्या ताब्यात घेतले त्याच्यात ताब्यात असलेल्या मुलाची सुखरूप सुटका करून घेतली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार