सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मंगरुळपीर तहसिल कार्यालय परिसरातुन चोरी गेलेल्या बुलेट गाडीचा पोलीसांनी लावला छडा,बुलेटसह तिन आरोपींना अटक

चोरी गेलेल्या बुलेट गाडीचा पोलीसांनी लावला छडा,बुलेटसह तिन आरोपींना अटक

Sudarshan MH
  • Jan 13 2021 4:33PM
सुदर्शन न्युज - January 13, 20210
स्थानिक गुन्हेशाखेची तत्पर कारवाई

अमोल रघुवंशी,वाशिम

वाशिम दिनांक १३.०१.२०२१

तहसिल कार्यालय मंगरूळपीर येथुन चोरीस गेलेली बुलेट गाडी स्थानिक गुन्हे शाखा वाशिम कडुन जप्त करुन याप्रकरणी ३ आरोपींना अटक करन्यात आली आहे.वाशिम स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्तव्यदक्ष आणी चाणाक्ष वृत्तीच्या जोरावर या प्रकरणाचा काही कालावधीतच छडा लावल्याने सिंघम शिवाजी ठाकरे आणी त्यांच्या मावळ्याचं पुर्ण जिल्ह्यात कौतुक होत आहे.याआधीही किचकट गुन्हे चुटकीसरशी सोडवून स्थानिक गुन्हे शाखेची टिम अव्वल ठरली आहे.वाशिम जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनात स्था.गु.शा.चे शिवाजी ठाकरे हे कर्तव्यनिष्ठतेने आपले कर्तव्य बजावत असुन त्यांचे सहकारीही तेवढ्याच सक्षमपणे गुन्हेगारांचा छडा लावुन त्यांना जेरबंद करन्यास चांगलेच पटाईत असल्याने स्थानिक गुन्हे शाखा ही पोलिस दलाचा आत्मा असल्याचे जनतेमधुन बोलल्या जात आहे.

दिनांक ३१/१२/२०२० रोजी तकारदार प्रदीप रामकृष्ण पोहाने वय ४४ वर्ष रा.कवठळ ता.मंगरूळपीर यांनी दुपारी १२.०० वा.सुमारास त्यांचे मालकीची रॉयल इनफिल्ड कंपनीची बुलेट क.एम एच ३७ यु ३०३३ ही तहसिल कार्यालय मंगरूळपीर परिसरात उभी करून कामानिमीत्त कार्यालयात गेले व कार्यालयातील कामकाज आटपुन सायं.६.०० वा.सुमारास गाडी घेण्यासाठी आले असता त्यांना गाडी दिसली नाही. गाडी रॉयल इनफिल्ड कंपनीची बुलेट क्र.एम एच ३७ यु ३०३३ किं १,२५,०००/- रू ची कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली अशा प्रकारचे रिपोर्ट वरून पोलीस ठाणे मंगरूळपीर येथे दिनांक ०१/०१/२०२१ रोजी अज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला.स्थानिक गुन्हे शाखे कडुन उपरोक्त गुन्हयाचा समांतर तपास सुरू असतांना गोपनीय माहीती मिळाली की, ग्राम तांदळी शेवई येथील मंगेश सावंत साथीदारांनी उपरोक्त गुन्हा केला असुन मंगेश सावंत चोरी केलेली बुलेट गाडी विकण्याच्या तयारीत आहे. सदर माहीती मिळताच पोलीस निरीक्षक शिवाजी ठाकरे यांनी त्यांचे अधिपत्याखाली अधिकारी व कर्मचारी यांना तात्काळ रवाना करून कायदेशीर कार्यवाही करणे बाबत निर्देश दिले. तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी क्षणाचाही विलंब न करता आंबेडकर चौक वाशिम येथे सापळा रचुन मंगेश विष्णु सावंत रा.तांदळी शेवई व त्याचा साथीदार मनोज संजय आवारे रा.भट उमरा यांना ताब्यात घेवुन बारकाईने विचारपुस केली असता त्यांनी मंगरूळपीर येथुन दिनांक ३१/१२/२०२० रोजी रॉयल इनफिल्ड कंपनीची बुलेट क.एम एच ३७ यु ३०३३ ची चोरी केल्याचे कबुली देवुन गाडी राहुल सुरवाडे यांचे कडे ठेवली असल्याचे सांगीतले राहुल सुरवाडे यांचे कडुन गुन्हयात चोरीस गेलेली मोटारसायकल ताब्यात घेन्यात आली आहे.आरोपींना अधिक बारकाइने विचारपुस केली असता त्यांनी एक महिन्यापुर्वी बस स्टॅन्ड वाशिम परिसरातुन हिरो एचएफ डिलक्स कंपनिची मोटारसायकलसुध्दा चोरी केल्याची कबुली दिल्याने सदर मोटारसायकल कींमत अंदाजे ६० हजार रुपयेची जप्त करन्यात आली.ऊपरोक्त प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेकडुन मंगेश विष्णु सावंत रा तांदळी शेवई,मनोज संजय आवारे राभट ऊमरा व राहूल दिलीप सुरवाडे रा वाशिम यांना मुददेमालासह ताब्यात घेतले असुन पुढील कार्यवाही साठी मंगरूळपीर पोलीस ठाणे येथील तपास अधिकारी यांचे कडे वर्ग करण्यात आले आहे.

उपरोक्त कार्यवाही मा.पोलीस अधिक्षक,श्री.वसंत परदेशी ,अपर पोलीस अधिक्षक,श्री.विजयकुमार चव्हाण यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक,शिवाजी ठाकरे, सपोनि अतुल मोहनकर, अजयकुमार वाढवे, पोउपनि एस एम पठाण ,सपोउपनि भगवान गावंडे,पोना राजेश राठोड,सुनिल पवार, अमोल इंगोले,संतोष शेणकुडे,यांनी केली आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार