(योगेश शर्मा)
बुलढाणा : सिंदखेडराजा तालुक्यातील बहुचर्चित खून प्रकरणात जिल्ह्यातील अमडापुर पोलिसांनी कसून तपासचक्रे फिरवून या प्रकरणात संशयित म्हणून दोन जणांना ताब्यात घेऊन त्यांना न्यायालया समक्ष उभे करून चौकशीसाठी दोन्ही संशयितांचा पीसीआर मागीतले असता चिखली न्यायालयाने दोन्ही संशयितांना पीसीआर दिला. यावरून अमडापुर पोलिसांनी त्या दोघांना न्यायालयीन कोठडी मध्ये टाकले. परंतु आता या दोन्ही संशयीतांपैकी एक जण हा अल्पवयीन असल्याबाबतचे वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यावर न्यायालयासह पोलीस प्रशासनाची सुद्धा चांगलीच तारांबळ उडाली असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत एडोव्हकेट मोहन कायंदे यांनी पोलीस प्रशासनाकडून अल्पवयीन संशयित याच्या मूलभूत हक्काचे उल्लंघन केले असल्याचे युक्तिवाद करत अल्पवयीन संशयित यास बालसुधारगृहात पाठवण्याची विनंती बुलढाणा न्यायालयाच्या समक्ष केल्यावर आज दिनांक २३ जून २०२१ रोजी सदर अल्पवयीन संशयिताला अटी व शर्ती याची पूर्तता करण्याचे सांगून त्याचा जामीन मंजूर केला. तर अल्पवयीन तरुणाला अटक करून पीसीआर, एमसीआर घेणारे तपास अधिकारी आणि पोलिस प्रशासन आता खडबडून जागे झाले आहे.
सदर प्रकरणाची हकीकत अशी की, चिखली तालुक्यातील पेनसावंगी येथील पुलाच्या खाली एक अनोळखी इसमाची प्रेत पाण्यावर तरंगताना काही व्यक्तीस दिसले असता त्यांनी सदरील घटना ही पेन सावंगी येथील पोलीस पाटील सौ गीता शेजुळ यांना कळविले. यावरून पोलीस पाटील संगीता शेजुळ यांनी अमडापुर पोलीस स्टेशन येथे सदरील घटनेची हकीकत कळवून एफआयआर नोंदवला. पोलिसांनी या अनुषंगाने कसून तपास कार्याला सुरुवात करत मोबाईल ट्रेकिंग व व तपासाच्या अनुषंगाने मुख्य आरोपी भरत जायभाये वय तीस वर्ष, रा. जागदरी यास व अल्पवयीन आरोपी यांना ६ जून रोजी अटक करून चिखली येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांचे कोर्टात हजर करून सदरील आरोपीसाठी पोलिस कस्टडी मागितली व ती चिखली न्यायालयाने मंजूर देखील केली. त्यानंतर सदरील आरोपींना मेहरबान न्यायालयासमोर आणले असता न्यायालयाने आरोपींना मॅजिस्ट्रेट कस्टडी म्हणजेच बुलढाणा येथील कारागृहामध्ये पाठविले. त्यानंतर पोलीस व सरकार प्रशासनाने बुलढाणा येथे जिल्हा न्यायालय मध्ये क्रिमिनल रिविजन दाखल करून पोलीस प्रशासनाने सदरील आरोपींची पोलिस कस्टडी मागितली असता न्यायालयाने सदरील अर्ज मंजूर करून दोन्ही आरोपींना दिनांक १६ जुन २१ रोजी पुन्हा पोलिस कस्टडी मध्ये पाठवण्याचा आदेश केला.
तर आरोपींचे वकील एडवोकेट मोहन कायंदे यांनी १६ जून २१ रोजी जिल्हा न्यायालयासमोर जामीन अर्ज दाखल करून त्या अर्जामध्ये त्यांनी एक आरोपी हा अल्पवयीन असल्याचा उल्लेख त्यांनी केला. त्यानंतर दोन्ही आरोपी हे अमडापुर पोलीस स्टेशन मध्ये कस्टडी मध्ये असल्याची माहिती एडवोकेट मोहन कायंदे यांना मिळाली असता त्यांनी १९ जून रोजी चिखली येथील प्रथमवर्ग नायालयामधे हजर होऊन पोलिस प्रशासनाकडून अल्पवयीन आरोपीला बेकायदेशीररित्या अटक केल्याचा अर्ज दाखल केला व युक्तीवादामधे असे नमूद केले की, पोलिस प्रशासनाकडून अल्पवयीन आरोपीस संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्कांचे उलंघन करण्यात आले. जेव्हा की अल्पवयीन आरोपी हा किशोर वयीन असल्याचे त्याची आईने पोलिसांना प्रथम दर्शनी कळविले असल्याचे सांगण्यात आले. अधिवक्ता मोहन कायंदे यांनी पोलिस प्रशासनचा हलगर्जी पणा न्यायालयासमोर युक्तिवादामधे मांडला व अल्पवयीन आरोपी यास बालसुधागृहात पाठविण्यात यावे अशी न्यायालयास विनंती केली. सदरील अर्जावर पोलिसांचे म्हणणे मांडण्यासाठी २१ जून ही तारीख देऊन न्यायालयाने अल्पवयीन आरोपी याला मॅजिस्ट्रेट कस्टडी मधे पाठविले तसेच एड. मोहन कायंदे यांनी बुलढाणा येथील जिल्हा न्यायालयामध्ये दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी केली असता (२१ जून रोजी) एड. मोहन कायंदे यांनी जिल्हा न्यायालया समोर युक्तिवाद करताना सर्व बाबींचा उलगडा न्यायाधीशां समोर मांडला व पोलिस प्रशासनाकडून अल्पवयीन आरोपी याचा संविधानिक अधिकारांचे उलंघन झाल्याचे जिल्हा न्यायाधीश यांचा निदर्शनास आणून दिले. सर्व कायदेशीर बाबींचा विचार करून जिल्हा न्यायाधीश यांनी पोलिस प्रशासनास त्वरित निर्देश देऊन सदर आरोपी हा अल्पवयीन असल्याचे मान्य करून जेल मधून त्वरित बाहेर काढून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी चिखली यांचा समोर हजर करून बालसुधागृहात टाकण्याचे निर्देश पोलिसांना दिले. त्यानंतर पोलिस प्रशासनाने धावपळ करून सदर अल्पवयीन आरोपी यास बुलढाणा बालसुधागृह येथे पाठविले. एड. मोहन कायंदे यांनी २३ जून रोजी बाल न्यायमंडळ येथे जामीन अर्ज दाखल करून युक्तिवाद केला व बाल न्यायमंडळ यांनी सर्व कायदेशीर बाबींचा विचार करून तसेच सरकार व पोलिस प्रशासनाचे म्हणणे विचारात घेऊन दिनांक २३ जून रोजी अल्पवयीन आरोपी यास अटी व शर्ती याची पूर्तता करण्याचे सांगून जामीन मंजूर केला व शासकीय रुग्णालय येथे वैद्यकिय चाचणीसाठी पाठविले.
सदर प्रकरणात एड मोहन कायंदे यांना एड दिलीप यंगड यांनी मदत केली. तर यावेळी एड मोहन कायंदे यांनी आपली प्रतिक्रिया देतांना सांगितले की, सदर बाब ही अतिशय गंभीर असून सदर प्रकरणात तपास अधिकारी यांनी आपल्या कर्तव्यातच कसूर केल्याचे एकंदरीत दिसून येते. खुनाच्या गुन्ह्यात इतका निष्काळजीपणा कसा काय होऊ शकतो हेच कळायला मार्ग नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस तपास अधिकाऱ्यावर सदरील प्रकरणात अक्षम्य चुकांमुळे कठोर कारवाई करावी. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यासाठी आम्ही तप्तर आहोत असे सांगितले.