सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*केंद्राने अनुमती दिल्यास राज्यांतही सलून सुरू करावे.*

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत गेल्या चार महिन्यांपासून सलून( केस कर्तनालय) बंद आहेत. अनलॉक सुरुवातीपासून व्यवसाय पूर्णपणे बंद असल्यामुळे नाभिक समाज अडचणीत आला आहे.

Snehal Joshi
  • Jun 14 2020 2:58PM
सोशल मीडियावर वाढलेल्या केसांबद्दल अनेक विनोद व्हायरल झाले आहे. मात्र केस कर्तनालय बंद असल्याने सामान्यांची चांगलीच गोची होते आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत गेल्या चार महिन्यांपासून सलून( केस कर्तनालय) बंद आहेत. अनलॉक सुरुवातीपासून व्यवसाय पूर्णपणे बंद असल्यामुळे नाभिक समाज अडचणीत आला आहे. मात्र सलून व्यवसाय सुरु करण्यासाठी केंद्र सरकारकडून परवानगी नसल्यामुळे राज्य सरकारने सलूनची दुकाने सुरु करण्यासाठी अद्याप परवानगी दिलेली नाही. मात्र केंद्राने परवानगी दिल्यास राज्यात सलून व्यवसाय सुरु करण्यासाठी राज्य सरकारची तयारी असल्याचे राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. राष्ट्रीय नाभिक महासंघ सलग्न महाराष्ट्र नाभिक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज राज्याचे अन्न,नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत सलून व्यवसायिकांच्या प्रश्नाबाबत महाराष्ट्र शासन सकारात्मक असून मंत्रीमंडळाच्या बैठकीत व्यावसायिकांच्या प्रशाबाबत चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिले. नाभिक समाजाचा प्रश्न घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सह भाजपचे ही सर्व नेते. कोविड चे संपूर्ण नियम पाळत नाभिक समाजासाठी सलून सुरू करण्याची मागणी करीत आहे. 

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार