सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

रक्तातील प्लाझ्मा दान करणारा प्रत्येकाला शासन देणार आर्थिक मदत*

रुग्णालयांमध्ये रक्तद्रव उपचाराची (प्लाझ्मा थेरपी) सुविधा आहे, परंतु सध्या बऱ्याच ठिकाणी गरजूंना रक्तद्रव उपलब्ध होत नाही.

Snehal Joshi
  • Jul 16 2020 10:41PM
राज्यातील १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये रक्तद्रव उपचाराची (प्लाझ्मा थेरपी) सुविधा आहे, परंतु सध्या बऱ्याच ठिकाणी गरजूंना रक्तद्रव उपलब्ध होत नाही. त्यामुळे आता शासनाने मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून रक्तद्रव दात्यांना २ हजारांची मदत देण्याचे ठरवले आहे. रक्तद्रव दात्यांचा एक दिवसाचा बुडणारा रोजगार व प्रवास खर्च म्हणून ही मदत असेल. या प्रकल्पाची जबाबदारी असलेल्या वैद्यकीय प्रशासनाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अत्यवस्थ करोनाबाधितांवर रक्तद्रव उपचार काही देशांमध्ये प्रभावी ठरत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २९ जूनला राज्यातील सर्व १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये या उपचाराच्या वैद्यकीय चाचणीचा आरंभ केला. करोनावर मात करणाऱ्या व्यक्तींना रक्तद्रव दान करण्याचे आवाहन केले गेले. या प्रकल्पाची जबाबदारी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला सोपवण्यात आली. उपचारासाठी आवश्यक रक्तद्रव मिळत नाही. त्यामुळे शासनाने आता रक्तद्रव दान वाढवण्यासाठी करोनामुक्तांना प्रोत्साहनात्मक प्रत्येकी २ हजार रुपये मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून.. शासनाने मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून वैद्यकीय संचालक कार्यालयाला सुमारे सोळा कोटी रुपयांचा निधी सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये रक्तद्रव उपचारासाठी पेढी उभारण्यासह इतर सोयींकरिता दिला आहे. यापैकी बराच निधी खर्च झाला आहे. शिल्लक निधी वैद्यकीय संचालक कार्यालय सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये नव्याने उघडल्या जाणाऱ्या या प्रकल्पाच्या खात्यात वर्ग करून तो रक्तद्रव दात्याला दिला जाईल. दानदाते वाढवण्यासाठी सुमारे सात दिवसांत राज्यभरातील वैद्यकीय महाविद्यालयांत दात्यांना दोन हजार रुपये प्रोत्साहनात्मक मदत  दिली जाईल. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार