सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कोल्हापुरातील कळंबा जेलमध्ये उघड झाले फोन कॉल रॅकेट; पोलीस अधिकारी कैद्यांना सामील?

कोल्हापुरातील कळंबा कारागृहातील अत्यंत धक्कादायक माहिती बाहेर आली आहे. कारागृहातून करण्यात येणार्‍या फोन कॉलचा दर ठरलेला

Sudarshan MH
  • Dec 28 2020 12:39PM

 

कोल्हापुरातील कळंबा कारागृहातील अत्यंत धक्कादायक माहिती बाहेर आली आहे. कारागृहातून करण्यात येणार्‍या फोन कॉलचा दर ठरलेला असून, त्याची रक्कम तब्बल पाच हजार रुपये आकारली जात असल्याचे व व या घोटाळ्यात अधिकाऱ्यांचे  मोठे अर्थकारण दडल्याचा संशय व्यक्त होत आहे.

कळंबा जेलमध्ये अलीकडेच मोबाईल व चार्जर आढळून आल्याने कारागृह प्रशासन खडबडून जागे झाले आहे. याप्रकरणी पोलिस तपास सुरू आहेया तपासात 'मोका' प्रकरणातील एका संशयिताने इचलकरंजीत नातेवाईकांकडे मोबाईलद्वारे संपर्क केल्याचे निष्पन्न झाले. त्या संशयिताच्या नातेवाईकांची इचलकरंजीत पोलिसांनी कसून चौकशी केली. कारागृहात सापडलेल्या मोबाईल नंबरचे कॉल डिटेल्स मागविण्यात आले आहेत. दरम्यान, त्या नातेवाईकांना घरी जाण्याची मुभा देण्यात आली असून, कॉल डिटेल्स प्राप्त होताच त्या नातेवाईकांची पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे.

या प्रकरणामागे मोठे अर्थकारण असल्याचा संशय व्यक्त होत आहे. कारागृहात सापडलेल्या मोबाईलद्वारे संशयित कैदी कोणाच्या संपर्कात होते, याचा तपास करणे सोपे आहे. तसेच संशयितांकडे मोबाईल, चार्जर, गांजा कोणी पोहोचवला व कोणत्या माध्यमाद्वारे पोहोचवला, याचाही तपास करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. पोलिस तपास यंत्रणा या प्रकरणाच्या मुळाशी पोहोचली तर एक रॅकेट उघडकीस येण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

व्हिडीओ कॉलिंग केल्याचाही संशय

कळंबा कारागृहात मोबाईल, चार्जर, गांजा सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही केलेल्या झाडाझडतीत मोबाईल, चार्जर, गांजा सापडला आहे. आता पुन्हा मोबाईल, चार्जर सापडल्याने कारागृहात मोबाईल, चार्जर पोहोचला कसा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारागृहातून व्हिडीओ कॉलिंग झाल्याचाही संशय व्यक्त होत आहे. अशाप्रकारे संपर्क करायचा असेल तर त्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागत असल्याची उघड चर्चा आता गुन्हेगारी वर्तुळात होत आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार