सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

विधान भवन, मुंबई येथे सुरु होणा-या विधानमंडळाच्या अधिवेशनाकरीता कोरोना चाचणीअनिवार्य.

वास्तव्याच्या नजीक असलेल्या अधिकृत प्रयोगशाळेचा दिनांक ४ सप्टेंबर, २०२० नंतर केलेला RT-PCR कोरोना चाचणीचा अहवाल देखील या सचिवालयास सादर करु शकतात व जवळपास तशी सुविधा उपलब्ध होत नसल्यास विधान भवन, मुंबई येथे उपरोक्त प्रमाणे करण्यात आलेल्या व्यवस्थेचा वापर करु शकतात.

Snehal Joshi . सौजन्य- राजेंद्र भागवत, सचिव
  • Aug 27 2020 10:38PM
महाराष्ट्र विधानपरिषद तसेच महाराष्ट्र विधानसभेच्या सर्व सन्मा.सदस्यांना कळविण्यात येते की, "सोमवार, दिनांक ७ सप्टेंबर, २०२० रोजीपासून विधान भवन, मुंबई येथे सुरु होणा-या विधानमंडळाच्या अधिवेशनाकरीता उपस्थित राहणा-या सदस्यांनी कोरोना विषाणू संसर्ग नसल्याबाबतचा अधिवेशनाच्या अगदी लगतपूर्वीचा अधिकृत प्रयोगशाळेचा अहवाल या सचिवालयाकडे सादर करणे आवश्यक राहील" असा निर्णय मंगळवार, दिनांक २५ ऑगस्ट, २०२० रोजी झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने विधान भवन, मुंबई येथील मुख्य प्रवेशद्वारा नजीक सन्मा. सदस्यांकरीता दिनांक ५ व ६ सप्टेंबर, २०२० रोजी सकाळी १०.०० ते सायं. ०६.०० वाजेपर्यंत RT-PCR कोरोना चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सन्मा.सदस्यांना असेही कळविण्यात येते की, ते त्यांच्या वास्तव्याच्या नजीक असलेल्या अधिकृत प्रयोगशाळेचा दिनांक ४ सप्टेंबर, २०२० नंतर केलेला RT-PCR कोरोना चाचणीचा अहवाल देखील या सचिवालयास सादर करु शकतात व जवळपास तशी सुविधा उपलब्ध होत नसल्यास विधान भवन, मुंबई येथे उपरोक्त प्रमाणे करण्यात आलेल्या व्यवस्थेचा वापर करु शकतात. मा.पीठासीन अधिका-यांच्या निदेशानुसार असेही कळविण्यात येते की, मा.मुख्यमंत्री तसेच मंत्री परिषदेतील सर्व मंत्री, राज्यमंत्री, मा.विरोधी पक्ष नेते व त्यांच्या सोबतचे स्वीय सहायक यांना विधान भवन इमारतीत प्रवेश करण्यासाठी वरीलप्रमाणे चाचणी केल्याचे प्रमाणपत्र सादर केल्याखेरीज प्रवेश दिला जाणार नाही. तसेच मंत्रालयातील व विधानमंडळ सचिवालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना देखील वरीलप्रमाणे चाचणी अहवाल सादर केल्याशिवाय विधानमंडळ इमारतीत प्रवेश दिला जाणार नाही. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार