सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शिवसेना खासदार भावना गवळी यांची आमदार पाटणीला जीवे मारण्याची धमकी

आमदाराच्या कानशिलात लगावली?शहरात तणावाचे वातावरण

Vashim. MH
  • Jan 26 2021 8:24PM
 
 
 
 
वाशिम- 26 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे जिल्हा नियोजन समितीच्या कार्यकारी समितीची सभा होण्यापूर्वी पूर्वी शिवसेना खासदार भावना गवळी यांनी भाजप जिल्हाध्यक्ष व आमदार राजेंद्र पाटणी या दोघात झाला वाद झाला. वादाचे पर्यावसान गुदमगुद्दीत झाले.खासदार गवळी यांनी आमदार पाटणी यांच्या कानशिलात लगावल्याची वार्ता शहरात पसरली.भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले.परिसरात एकच खळबळ उडाली.आमदार पाटणी यांच्या समर्थनार्थ भाजपा कार्यकर्ते रस्त्यावर उतरले त्यांनी बाजार पेठ बंद केली. खासदार भावना गवळी यांच्या निषेदार्थ घोषणाबाजी करत भाजपा कार्यकर्त्यांनी खासदार भावना गवळी यांच्या प्रतिमेचे दहन केले. शहरात तणावाचे वातावरण पसरले असून जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
भावना गवळी यांच्या समर्थनार्थ शिवसेना रस्त्यावर उतरली आहे.भाजपाने पुकारलेल्या बंद विरोधात शिवसेनेने प्रतिआंदोलन पुकारले.कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जादा पोलीस कुमक बोलविण्यात आली आहे.
 सदर प्रकरणी खासदार भावना गवळी यांच्या विरोधात आमदार राजेंद्र पाटणी यांनी अश्लील शिवीगाळ तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार वाशिम शहर पोलीस स्टेशन ला दिली आहे.वृत्त लिहिस्तोर गुन्ह्याची नोंद करण्यात आली नव्हती.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार