सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सैनिकी बँकेच्या अधिकार्यांवर तत्काळ कारवाई न केल्यास आमरन ऊपोषण.........अन्याय निर्मूलन सेवा समीती.

पारनेर सैनिक बँक चेअरमन, मुख्य कार्यकारी अधिकारी,संचालक मंडळ, व अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्वरित अटक करावी

Sudarshan MH
  • Dec 15 2020 12:04PM

अहमदनगर
      पारनेर

पारनेर सैनिक बँक चेअरमन, मुख्य कार्यकारी अधिकारी,संचालक मंडळ, व अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्वरित अटक करावी -अन्यथा उपोषण करन्याचा ईशारा अन्याय निर्मूलन सेवा समितीने दीला आहे.

काय आहे प्रकरण? 
    कर्जत शाखेत संजय गांधी अनुदान रक्कम हडप.

  पारनेर तालुका सैनिक बँकेच्या कर्जत शाखेत संजय गांधी निराधार योजनेत भ्रष्टाचार करून मयत खातेदाराच्या खात्यावरील पैसे हडप केल्या प्रकरणी बँकेच्या सदाशिव फरांडे ,दीपक अनारसे या अधिकाऱ्यांवर कर्जत पोलीस ठाण्यात शासकीय गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु या बँकेत मोठ्या रकमेचा अपहार झाला असल्याने आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने चौकशी करून बँकेचे चेअरमन शिवाजी व्यवहारे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोरडे,संचालक मंडळ, व अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत.  अशी मागणी अन्याय निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे, पारनेर तालुकाध्यक्ष पप्पू कासौटे, जिल्हा सचिव श्री.वैभव पाचारने व भरत हटावकर यांनी जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
         याबाबत सविस्तर असे की, पारनेर सैनिक बँकेच्या कर्जत शाखेत शाखाधिकारी व कर्मचारी यांनी संगनमताने संजय गांधी निराधार योजनेच्या मयत लाभार्थ्यांच्या खात्यावरील पैसे हडप करून अपहार केला होता. त्याप्रकरणी अन्याय निर्मूलन सेवा समितीने पाठपुरावा केल्यानंतर लेखापरीक्षण अहवालानंतर कर्जत पोलीस ठाण्यात अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु सदर गुन्ह्यात अपहराची रक्कम मोठी असल्याने आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने सखोल चौकशी करून बँकेच्या चेअरमन, मुख्य कार्यकारी अधिकारी,संचालक मंडळ,व अधिकाऱ्यांवर देखील गुन्हे दाखल करावेत. तसेच कर्जतचे तत्कालीन तहसीलदार यांनी  अपहार करणाऱ्या आरोपीना पाठीशी घातल्याने  त्यांची देखील चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्वरित अटक करावी अन्यथा मा. जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर दिनांक २२/१२/२०२० रोजी उपोषण करणार आहोत. अशी मागणी अन्याय निर्मूलन सेवा समितीच्या वतीने जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे केली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार