सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

वर्षानुवर्षे रखडलेल्या जांबुत ते पोखरी रस्त्याचे झाले भुमीपुजन ..

पारनेर ः जिल्हा परिषद अहमदनगर मौजे म्हसोबा व पोखरी येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन

Sudarshan MH
  • Dec 8 2020 1:36PM

अहमदनगर
         पारनेर

पारनेर ः जिल्हा परिषद अहमदनगर मौजे म्हसोबा व पोखरी येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती मा. काशिनाथ दाते सर यांच्या  हस्ते करन्यात आले तसेच पोखरी येथील पोखरी ते जांबुत रस्ता सुधारणा करणे रुपये 5 लक्ष अशा एकूण 15 लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन सभापती काशिनाथ दाते सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना सभापती म्हणाले मसोबाझाप येथील सर्वच विकासाची कामे माझ्या मार्गाने झाली आहेत आणि यापुढेही सर्वच कामे करून देईन याची काळजी करू नका लोकांनी चांगल्या मार्गाचा अवलंब करून विकासासाठी एकत्र येऊन काम करुया असे आवाहनही सभापती दाते यांनी केले. पोखरी ते जांबुत रस्ता हा अतिशय महत्वाचा होता या रस्त्याची मागणी फार दिवसांची होती. या पठारावर येथील शेतकर्‍यांच्या जमिनी आहेत परंतु हा रस्ता कच्चा असल्याने पावसाळ्यात हा रस्ता अतिशय खराब होतो त्यामुळे शेतकर्‍यांना शेतात जाण्या-येण्या करिता शेतीमाल बाहेर काढण्याकरता अडचणी येत असे तसेच या रस्त्याने जांबुत ला जाण्यासाठी अगदी जवळ झाले आहे. यावेळी पोखरी ग्रामस्थांनी रस्ता पक्का करून देण्याची मागणी केली असता सभापती काशिनाथ दाते यांनी आगामी आर्थिक वर्षात या रस्त्यात निधी उपलब्ध करून हा रस्ता डांबरीकरण करून देण्याचे आश्वासन दिले. सर्व ग्रामस्थांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना दाद दिली यावेळी म्हसोबा झाप उपसरपंच भाऊसाहेब आहेर, तुकाराम दरेकर, दाते भाऊसाहेब, गोविंद आग्रे, संजय आहेर, जयसिंग आग्रे, बाबाजी आहेर, मच्छिंद्र आहेर, भाऊ शंकर आहेर,  रामदास दरेकर ,जयराम आहेर ,रोहिदास आहेर ,बाबाजी आहेर ,तुकाराम आहेर, लक्ष्मण आहेर, निवृत्ती आहेर ,बाबाजी दरेकर ,भागाजी आहेर, नामदेव आग्रे, भानुदास आहेर, विठ्ठल आग्रे ,नवनाथ आग्रे, रामदास आहेर, पांडुरंग भालके, बाबाजी पुरी, कारभारी दरेकर, नरसु आग्रे, भाऊ आहेर, बबन आहेर, गोविंद आहेर, भाऊ दरेकर ,सुका आहेर, झुंबर दुधवडे ,काशिनाथ दुधवडे, सोमा मधे, संपत मधे, बबन मधे, संदीप आहेर, संपत दरेकर, कैलास आहेर, भास्कर आहेर, संतोष गाढवे ,चंद्रकांत वाळुंज, भरत शिंदे, लक्ष्मण शिंदे, विकास आहेर ,रंगनाथ दाते, दादाभाऊ पवार ,महेंद्र पवार , मनीषा आहेर, हिराबाई चिकणे, कांताबाई पवार, कामाचे ठेकेदार स्वप्निल आग्रे ,बबन वाळुंज, ग्रामसेवक विशाल झावरे, दातीर भाऊसाहेब,  सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे महांडुळे उपस्थित होते ,यावेळी पोखरी येथून सरपंच ,उपसरपंच ,सेवा सोसायटीचे चेअरमन , ग्रामपंचायत सदस्य व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसरपंच भाऊसाहेब आहेर यांनी केले तर आभार तुकाराम दरेकर यांनी मानले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार